निधीअभावी पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:19 PM2018-02-04T22:19:14+5:302018-02-04T22:20:59+5:30
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. या विश्रामगृहाच्या शेजारी असणारे सागवनाचे मौल्यवान वृक्ष असुरक्षित आहेत. विश्रामगृहाचा कायापालट करण्याची मागणी होत आहे.
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या पाठबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची जीर्ण झालेली अवस्था धोकादायक झाली आहे. या विश्रामगृहाचे आवाराला असणारे तारेचे सुरक्षा कवच पुर्णत: तुटले आहे. यामुळे विश्रामगृहाचे जागेतून रहदारी वाढली आहे. याच विश्रामगृहाचे आवारता सागवनाचे मौल्यवान वृक्ष आहेत. ही वृक्ष आता सुरक्षीत नाही. विश्रामगृहाचे स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. या विश्रामगृहात तिन इमारती आहे. या इमारती भंगारावस्थेत आहेत. विश्रामगृहात यंदा शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे यत्रणेमार्फत दोन बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. चांदपूर जलाशयाचे सिंचनासाठी देण्यात येणाºया पाणी वाटपाचे प्रश्नावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कार्यकारी अभियंता चोपडे यांनी हजेरी लावली आहे. विश्राम गृहाचे समस्या त्यांनी अनुभवल्या आहेत. बैठकीचे निमित्ताने वर्षातून एक किंवा दोनदा या विश्रामगृहात पाटबंधारे विभागाची यंत्रणा हजेरी लावत आहे. यानंतर कुणी ढुंकून ही पाहत नाही. विश्रामगृहाचे देखभाल व दुरुस्तीकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात येत नाही. अंदाजे अर्धा एकर जागेत असणाऱ्या या विश्रामगृहाचे शेजारी बगीचा तथा कायापालट करण्याचे ओरड आहे.
विश्रामगृहाचे संदर्भात यंत्रणा सकारात्मक निर्णय घेत आहे. पंरतु शासन स्तरावर निधी उपलब्ध करण्यात येत नाही. याआधी विश्रामगृहाची सुरक्षा व स्वच्छता करण्यासाठी मजुर कामावर ठेवण्यात येत होते. पंरतु पाठबंधारे विभागात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. रिक्त पदावर नियुक्त्या अडल्या असल्याने मनुष्य विरहीत विभागाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे. या विभागात पदे रिक्त असल्याने विश्रामगृहात कर्मचाºयांची नियुक्ती बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासन या विश्रामगृहाचे पुर्नजिवीत कडे गंभीर नाही. या राज्य मार्गावरुन शासनाची यंत्रणा धावत आहे. पंरतु विश्रामगृहाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाची मालमत्ता असून रनेरा गावात ही आहे.