अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:31 PM2018-01-11T22:31:54+5:302018-01-11T22:32:06+5:30

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे.

Illegal tree trunk in the Adal area | अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

googlenewsNext
ठळक मुद्दे कातुर्ली येथील प्रकार : वनक्षेत्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, जप्तीचे लाकडे वाऱ्यावर

प्रकाश हातेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे. वनविभागाला याचा लाखोंचा फटका बसत आहे.
पवनी तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगल व्याप्त आहे. तालुक्यात पवनी वनक्षेत्र १६ हजार ३८४ हेक्टर असून अड्याळ, सावरला, नेरला, भुयार, खापरी, केसलवाडा, तिर्री आदी परिसर जंगलव्याप्त आहे. तालुक्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. खरीप हंगामानंतर काहीही काम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील काहीची नजर जंगलातील वृक्षाकडे गेली. जंगलातील मौल्यवान सागवनाची झाडे तोडून त्यांची चिराण करून लाखो रूपयाला विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यात काही वनअधिकाºयाचा मुख्य परवाना असल्याचे सुत्रानी सांगितले. याशिवाय रॉकेल व गॅसच्या किंमती वाढल्याने स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जंगलात जात असून सरपणाच्या नावावर सागवनाची झाडे तोडली जात आहेत.
अड्याळ वनक्षेत्रात तिर्री, कलेवाडा, नेरला, येटेवाही येथे दाट जंगल असून हा परिसर उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागून आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असतो. जवळच्या कातुर्ली येथील समाज मंदिरासमोर सागवान, आंबा, बोर, अंजन, कीन आदी वृक्ष कापून रचून ठेवण्यात आले आहेत. वास्तविकता शेतातील झाड कापल्यानंतर ते विना परवानगीने इतरत्र हलविता येत नाही. परंतु ही सर्व लाकडे विना परवानगीने हलविण्यात आली आहेत. यामध्ये वनअधिकारी व कंत्राटदाराचा संगणमत असतो. घटना स्थळाला वनक्षेत्राधिकाºयांनी भेट देवून तोडलेली लाकडे जप्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जप्ती केलेली लाकडे खुल्या मैदानात पडलेल्या स्थितीत असून चोरीला जाण्याचा प्रकार होत आहे. या लाकडांची योग्य विल्हेवाट लावून कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
परिसरात बाभुळ वृक्षाच्या नवाखाली शेत शिवारातील आडजात वृक्षांचीही विना परवाना कंत्राटदार ट्रक, ट्रॅक्टरने, भंडारा, नागपूर, नागभिड येथे अवैध लाकडाची तस्करी करीत आहेत. पहाटे घराबाहेर पडून महिला व पुरूष सरपणाच्या नावाखाली महिला झाडाची कत्तल करून मोळ्या आणतात. पुरूष सागवणाची शेती उपयोगी अवजारासाठी परिसरात पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास सायकलवर विक्री करताना आढळतात. जंगलातील झाडे कापून ते शेतातील झाडांमध्ये मिसळविण्याचा गोरखधंदा भंडारा विभागात अनेक वर्षापासून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Illegal tree trunk in the Adal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.