बंंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:47 PM2018-05-22T22:47:56+5:302018-05-22T22:48:07+5:30

सिंचनाकरिता बहुउपयोगी असलेला जेवनाळा निमगाव मार्गावरील बंधाºयाच्या कामात रेती ऐवजी तेथीलच खडक वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवरून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी निवेदनातून केली आहे.

Indoor construction is inferior! | बंंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट!

बंंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट!

Next
ठळक मुद्देरेतीऐवजी मातीमिश्रीत खडकाचा वापर : अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : सिंचनाकरिता बहुउपयोगी असलेला जेवनाळा निमगाव मार्गावरील बंधाºयाच्या कामात रेती ऐवजी तेथीलच खडक वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवरून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी निवेदनातून केली आहे.
मनोहर हेमने व नीळकंठ हेमणे यांच्या शेताशेजारील नाल्यावर बंधाऱ्याचे काम सुरु आहे. काम उत्कृष्ट व्हावे याकरिता शेजारील शेतकरी सुद्धा सूचना सदर कामावरील मजुरांना करीत आहेत.
या कामावर जेवनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच धर्मपाल लांबकाने व सदस्य प्रशांत गिºहेपुंजे, सोमेश्वर हेमणे यांनी भेट देत सदर बांधकामाचा निकृष्ट प्रकार पुढे आणला. कामावरील मजुरांनीसुद्धा बांधकामात रेती ऐवजी खडकांचा वापरत असल्याची धक्कादायक माहिती दिली.
यापूर्वी २००० साली याच बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. पण अशाच लबाड प्रवृत्तीमुळे बंधाऱ्याचे काम निकृष्ट करून बंधाऱ्यावरील गेट सुद्धा चोरीला गेल्याने बंधारा सिंचनाविना उभा होता. या बंधाऱ्याला न्याय मिळावा शेतीसिंचनाला लाभ / हातभार लागावा याकरिता आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नांनी सदर कामाला निधीची तरतूद करून दिली पण आजही पुन्हा २००० सालची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

सदर कामाची भ्रमणध्वनीवरून तक्रार मिळाली आहे. प्रत्यक्ष कामावर भेट देवून सत्य काय आहे याची शहानिशा करून उत्कृष्ट काम करण्याकरिता संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील. काम निकृष्ट असल्यास त्याची दखल घेतली जाईल.
- सुशांत गडकरी, शाखा अभियंता
लघुपाटबंधारे विभाग साकोली.

Web Title: Indoor construction is inferior!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.