लोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:22 PM2018-02-09T22:22:52+5:302018-02-09T22:23:30+5:30

बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे.

Lokrajya, Marathi Language Literature Convention Special | लोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय

लोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय

Next

आॅनलाईन लोकमत
भंडारा : बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सुवर्ण योग साधून माहिती व जनंसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्यचा विशेषांक साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन या विषयावर काढला आहे. हा अंक वाचनीय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.
लोकराज्य अंकात शारदादेवीची यात्रा, सारे काही मराठीसाठी, प्रबोधनाचे शिल्पकार, यशो शिखरावर कसे जाल, आतापर्यंतची साहित्य संमेलने, अशी करावी अक्षरसाधना, मराठी आणि करिअर संधी, मराठी भाषेच्या रुपातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन, कापौरेट प्रशासनाचे सूत्रधार, समाज माध्यमांची शक्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट : नवी संधी, पुरातत्वशास्त्र : शोध मानववंशाचा कौशल्यातून उन्नतीकडे, स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ, यशदामध्ये नागरी सेवा, परीक्षेची तयारी, प्रशासकीय सेवेचा राजमार्ग, मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषद २०१८ व ‘येथे कर माझे जुळती’ अशी अनेक सदरे येथे वाचनीय आहेत.

Web Title: Lokrajya, Marathi Language Literature Convention Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.