दोन अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 10:39 PM2018-06-03T22:39:42+5:302018-06-03T22:40:00+5:30
मोहाडी तालुक्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक ६५ वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली. पहिली घटना मोहाडी शहरात तर दुसरी घटना पांजरा पालोरा मार्गावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी/करडी : मोहाडी तालुक्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक ६५ वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली. पहिली घटना मोहाडी शहरात तर दुसरी घटना पांजरा पालोरा मार्गावर घडली.
मोहाडी येथील सुभाष वॉर्डातील आरिफ रफिक शेख (२७) या युवकाच्या दुचाकी वाहनाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. लगेच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे लगेच निधन झाले. आरिफ शेख हे पेट्रोल भरण्यासाठी मोहाडी पेट्रोलपंपवर गेले होते. पेट्रोल भरुन घराच्या दिशेने येत असतांना बसस्टॉप जवळच्या वळणावर एका अज्ञात चारचाकी गाडीने धडक दिली. ही घटना सायंकाळी ४.४५ वाजताची आहे. धडक देण्याऱ्या गाडीचा शोध मोहाडी पोलीस घेत आहेत.
करडी (पालोरा) : पालोरा आठवडी बाजारातून बाजार करुन पांजरा या स्वगावी जाणाºया महिलेला पाठीमागेहून येणाºया मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात कमला आनंदराव मानकर (६५) रा. पांजरा/बोरी यांचा जागीच पाय तुटला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटना २ जून रोजी पालोरा पांजरा दरम्यानच्या राज्यमार्गावर ७.३० वाजता च्या सुमारास घडली. वाहनचालकाचे नाव विनोद देवीदास कुंभारे (४९) रा. माडगी असे आहे.
शनिवारी पालोरा येथील आठवडी बाजार आटोपून पायी पांजरा गावाकडे जात असलेल्या महिलेला पाठीमागेहून येणारी दूचाकी क्रमांक एम एच ३६/एसटीएफ ४६५७ चे वाहनचालक विनोद देवीदास कुंभारे (४९) रा. माडगी याने जोरदार धडक मारली. यात कमला आनंदराव मानकर हीचा जागीच पाय तुटून हड्डी बाहेर निघाली. तसेच डोक्याला गंभीर इजा झाली. दुचाकीचालक पालोराकडून पांजराकडे भरधाव वेगाने जात होता. तसेच तो दारुच्या नशेत असल्याने वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात केल्याचे सांगितले जात आहे.
अपघात घडताच बाजारावरुन गावाकडे जाणारे मदतीसाठी धावले. लगेच करडी पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कमलाबाई यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे भरती केले. पंरतू प्रकृती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी भंडारा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला. आरोग्य केंद्राच्या वाहनाने तीला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली असून वाहनचालक विनोद कुंभरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास करडी पोलीस करीत आहेत.