पवनीत ‘मैत्र’ने दिले घुबडाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2016 12:38 AM2016-10-05T00:38:37+5:302016-10-05T00:38:37+5:30

येथील मैत्र संरक्षण व संवर्धन संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जखमी झालेल्या घुबडाला वाचवण्यात यश मिळवले.

Pavitha 'friendship' gave the owl alive | पवनीत ‘मैत्र’ने दिले घुबडाला जीवदान

पवनीत ‘मैत्र’ने दिले घुबडाला जीवदान

Next

पवनी : येथील मैत्र संरक्षण व संवर्धन संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जखमी झालेल्या घुबडाला वाचवण्यात यश मिळवले. सोमवार ३ आॅक्टोबरला या प्राणी व पक्षी प्रेमींना येथील न.प. विद्यालयासमोर एक घुबड जखमी अवस्थेत आढळला. मैत्रचे माधव वैद्य, अजय पचारे यांनी वनपरिक्षेत्राचे अधिकारी डी.एन. बारई, डी.व्ही. राऊत यांच्या मदतीने वन विभाग कार्यालयात नेले. डॉ.बावनकर यांनी जखमी घुबडाला औषधोपचार केला. सदर घुबडाच्या परवाना गंभीर इजा झालेली होती. वन कार्यालयता सध्या या घुबडावर डॉक्टरांची देखरेख असून पूर्ण बरा झाल्यावर निसर्गाच्या नैसर्गीक अधिवासात त्याला सोडले जाईल, असे वनअधिकारी डी.एन. बारई यांनी सांगितले. 
मैत्र संस्थेचे अध्यक्ष अजय पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, माधव वैद्य, महेश मठीया, अमित काटेखाये, चेतन हेडाऊ, नामदेव मेश्राम यांचे वनविभागातर्फे अभिनंदन करण्यात आले. १ ते ७ आॅक्टोबरपर्यंत सर्वत्र वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pavitha 'friendship' gave the owl alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.