किल्ला पर्यटनांतर्गत प्लास्टिक स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 09:58 PM2018-06-24T21:58:57+5:302018-06-24T21:59:15+5:30
स्थानिक ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबने जिल्ह्यातील आंबागड, सानगडी व पवनी येथील ऐतिहासिक दुर्ग असलेल्या ठिकाणी किल्ला पर्यटन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही किल्ल्यावर प्लास्टिक संकलन करून पर्यावरण दिनाचा सप्ताह साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानिक ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबने जिल्ह्यातील आंबागड, सानगडी व पवनी येथील ऐतिहासिक दुर्ग असलेल्या ठिकाणी किल्ला पर्यटन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही किल्ल्यावर प्लास्टिक संकलन करून पर्यावरण दिनाचा सप्ताह साजरा केला.
तसेच ऐतिहासिक वास्तूबद्दल माहिती व्हावी याकरिता ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, पदाधिकारी दिनकर कालेजवार, दिलीप भैसारे, निसर्गमित्र पंकज भिवगडे व नितीन पटले यांनी सानगडी, पवनी, सिंदपुरी, विहार व आंबागड या किल्ल्यावर तसेच चंद्रकांत पालांदूरकर, निखील पिल्लारे, राजेश खुटमुडे, अमर चौदलवार, मनिष बिसने, प्रणव बारेजू, दिप चिचखेडे, राकेश निपाने,प्रणय कापसे या गोंदिया व नागपुरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आंबागड किल्ल्यावर ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब सोबत हेरिटेज वॉकमध्ये सहभाग नोंदविला.
ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आंबागड किल्ल्याच्या आतील विस्तृत परिसरात गडाच्या पायºयांवर पर्यटकांनी टाकलेले विविध प्रकारचे प्लास्टीक संकलन करून किल्ला स्वच्छता मोहिम राबविली. अशीचप्लास्टीक स्वच्छता मोहीम त्यांनी सानगडी, पवनी, सिंदपुरी या पर्यटनस्थळी सुद्धा राबविली. २३ जून पासून महाराष्ट्र शासन पर्यावरण मंत्रालयातर्फे आयोजित नो प्लास्टीक मोहिमेला एक प्रकारे पाठींबा दर्शविला. भंडारा जिल्ह्यातील या तिन्ही ऐतिहासिक स्थळावर मूलभूत सोयींचा अभाव आहे, हे प्रकर्षाने ग्रीनफ्रेन्डस्ला जाणवले. ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबचे संघटक प्रा.गायधने यांनी सानगडी किल्ल्याबद्दल, नावाबद्दल त्या ठिकाणी असलेल्या तोफेबद्दल त्याचप्रमाणे पवन राजाने पवनी शहरात बांधलेला किल्लासदृष्य संरक्षक भिंत, भोवताल असलेले त्या काळातील पाण्याच्या खंदकाच्या खुणा तेथील बुरुजांचे वैशिष्ट्य, सिंदपुरी येथील पॅगोडा विहार तसेच आंबागड या विस्तृत व दुर्गम जंगलातील टेकडीवरील महत्व, बंदीवानांना शिक्षा देण्याकरिता त्याचा वापर, पडझड झालेले महाल, कोगरे, विषारी प्राणी ठिकाण शस्त्राशस्त्रे कोठार, राजे लोकांचे निवासस्थान व्यवस्था, तटबंदी, बुरूज, त्यांची निर्मिती व त्यामागचा इतिहास इत्यादी ऐतिहासिक बाबींची माहितीया हेरिटेज वॉक दरम्यान सर्व सदस्यांना दिली.
त्याचवेळी शासनाच्या पुरातत्व खात्याने या तिनही किल्ल्यातील पडझड झालेले वास्तू खोल्या, संरक्षक भिंत यांना ऐतिहासिक पद्धतीने दुरुस्त करून सुधारणा करून त्यात प्रत्येक ठिकाणी माहितीदर्शक बोर्ड लावणे आंबागड किल्ल्यावर गडावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबने शासनाला केली आहे.