चान्ना येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:03 AM2018-01-06T01:03:33+5:302018-01-06T01:03:49+5:30
तालुक्यातील चान्ना/ धानला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील चान्ना/ धानला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला.
चान्ना/धानला येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अमित बनकर या तरुणाचा आंतरजातीय विवाह लोकेश्वरी डेकाटे यांच्यासोबत सत्यशोधन पध्दतीने करण्यात आला. तांदाळाच्या अक्षदाऐवजी फुलांच्या पाकळया देण्यात आल्या. वरवधुंनी एकमेकास जिवनभर साथ देण्याची शपथ घातली.
या कार्यक्रमाला माळी महासंघाचे प्रदेश संघटक वेनुगोपाल शेंडे, अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, अतिथी म्हणून जयकृष्ण फेंडरकर, ईश्वर अर्जुनकर, जयश्री बारस्कर, स्नेहा भुसारी, सरपंच उर्मिला राघोर्ते उपस्थित होत्या. याप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गोपाल बनकर, प्रास्ताविक उपसरपंच होमराज बनकर, आभारप्रदर्शन राजु बनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकेश बनकर, राजेश सावरकर, हरिश्चंद्र बनकर, रंजीत लांजेवार, मोहन डोमळे यांनी सहकार्य केले.