आयटी प्रश्नमंजुषा स्पर्धेत शास्त्री विद्यालयाची चमू देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:31 PM2017-11-23T23:31:41+5:302017-11-23T23:31:54+5:30
येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.
दरवर्षी घेण्यात येणाºया या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात कर्नाटक चमू व इतर चार अशा पाच चमुंचा पराभव करून सदर यश संपादीत केले. ही स्पर्धा टाटा सर्व्हिस मार्फत आयोजित करण्यात येत असून विजेत्यांना शिल्ड, एक लाख रूपये रोख, बॅग, अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तु सोबत शिष्यवृत्ती अशा स्वरूपात बक्षीस मिळाले आहे.विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. एस.जी. यावलकर, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, प्रा. एन.जी. गायधने, अन्य शिक्षकवृंद व पालकांना दिले आहे.