रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:34 AM2017-09-02T00:34:02+5:302017-09-02T00:34:39+5:30

तुमसर रोड रेल्वे फाटकात गुरूवारला तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने फाटकाची हालचाल बंद पडली. पर्यायी फाटकाचा उपयोग येथे काही वेळ करण्यात आला.

Technical failure in the rail fas | रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड

रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड

Next
ठळक मुद्दे४५ मिनिटे फाटक बंद : दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड रेल्वे फाटकात गुरूवारला तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने फाटकाची हालचाल बंद पडली. पर्यायी फाटकाचा उपयोग येथे काही वेळ करण्यात आला. तांत्रिक कर्मचाºयांनी स्टेशन अधिक्षकांकडून परवानगी नंतर तांत्रिक बिघाड दूर केला. सुमारे ४५ मिनिटे फाटक बंद होते. बंद फाटकाचा फटका शेकडो प्रवाशांना बसला.
दक्षिण पूर्व रेल्वेच्या तुमसर रोड येथे ५३२ रेल्वे फाटकावर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने फाटकाची हलचल बंद पडली होती. सकाळी १०.३० वाजता त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. फाटकाजवळील इलेक्ट्रॉनिक स्लॉटमध्ये हा तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तुमसर-गोंदिया मार्गावर ही रेल्वे फाटक असून प्रचंड गर्दी येथे सतत असते.
रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी प्रदीप मिश्रा व अन्य चार कर्मचाºयांनी शर्तीचे प्रयत्न करून रेल्वे फाटकातील तांत्रिक बिघाड दूर केला. दरम्यान फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. चोवीस तासात येथून सुमारे १८० प्रवाशी व मालगाड्या येथून धावतात. सध्या येथे रेल्वे उड्डाणपुलाचे कामे सुरू असल्याने वाहनांची कोंडी निर्माण होत आहे.
बुधवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकाला नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक बी.डी. बर्मन यांनी भेट दिली होती. नागपूर-गोंदिया दरम्यान रेल्वे ट्रॅकची पाहणी करीता ते आल्याची माहिती आहे. तुमसर रोड येथे वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांसोबत त्यांनी बैठक घेऊन निर्देश दिले.
मुंबई-हावडा रेल्वे मार्ग ब्रिटीशकालीन असून खबरदारीच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती आहे. रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे बांधकाम स्थळांचे त्यांनी निरीक्षण केले. विविध विभाग कार्यालयांना त्यांनी भेट देऊन विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले.

Web Title: Technical failure in the rail fas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.