सानगडीत वैकुंठ चतुर्दशीची परंपरा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:49 PM2017-10-31T23:49:23+5:302017-10-31T23:49:44+5:30

ऐतिहासिक आणि पारंपरिक दृष्ट्या प्रसिध्द असलेली सानगडी येथील वैकुंठ चतुर्दशीला निघणारी श्रीधरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा यावर्षी २ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता निघणार आहे.

The tradition of Sanangadi Vaikunth Chaturdashi is still retained | सानगडीत वैकुंठ चतुर्दशीची परंपरा आजही कायम

सानगडीत वैकुंठ चतुर्दशीची परंपरा आजही कायम

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारी निघणार रथयात्रा : विविध कार्यक्रमांची रेलचेल

पुरूषोत्तम डोमळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : ऐतिहासिक आणि पारंपरिक दृष्ट्या प्रसिध्द असलेली सानगडी येथील वैकुंठ चतुर्दशीला निघणारी श्रीधरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा यावर्षी २ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता निघणार आहे. २०७ वर्षांपासूनची भोसलेकालीन पंरपरा आजही अवितरतपणे सानगडीत सुरू असून यात्रेकरिता सानगडी व जिल्ह्यातील भाविक सहभाग घेतात. रथयात्रेनिमित्त सानगडीत धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात.
नागपूरचे भोसले घराण्याचे सानगडी येथील किल्ल्यावर वर्चस्व आल्यापासून येथे अनेक ब्राम्हण कुटूंब वास्तव्यास आले. भोसलेकरांनी केनकर या कुटूंबाकडून रथयात्रेची सुरुवात केली. यावर्षी यात्रेचे २०७ वे वर्ष असून सानगडीवासी आजही तितक्याच भक्तीभावाने लाकडी रथावर विठ्ठलाची शोभायात्रा काढतात. पूर्वी विठ्ठलाच्या रथाचा आकार लहान होता. ढोलानंतर ६ मजली रथाची निर्मिती करण्यात आली रथयात्रेची ही मिरवणूक संपूर्ण गावात रात्रभर फिरविली जायची परंतु आता रथयात्रेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रागंणात करण्यात येते. त्यावेळी आखाडयाचे खेळ, दांडपट्टा, कुस्ती आदीचे आयोजन करण्यात येत असे. आता सर्व परंपरांना फाटा देऊन आर्थिक व सामाजिक जनजागृती करण्यात येते. रूक्मीनीच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक सानगडी येथे येतात. २ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता तुळशी पूजन व विवाह व रात्री ८.३० वाजता पूजन करून रथयात्रेला सुरूवात होईल. या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमेटीचे गिरीधर नेवारे, राजेश पेराकर, शिवानाथ वाघाडे, हरिचंद्र राऊत, हिरामन कोहळे यांनी केले आहे.

Web Title: The tradition of Sanangadi Vaikunth Chaturdashi is still retained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.