परतीच्या पावसाने कापसाला उगवली रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:56 PM2017-10-20T23:56:50+5:302017-10-20T23:57:29+5:30
हातात कपासीचे पीक हाती येण्याची स्थिती असताना परतीचा पाऊस बरसला़ त्यामुळे वेचनीसाठी तयार झालेल्या कापसाला रोपे उगवल्याने शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
सुब्बई: हातात कपासीचे पीक हाती येण्याची स्थिती असताना परतीचा पाऊस बरसला़ त्यामुळे वेचनीसाठी तयार झालेल्या कापसाला रोपे उगवल्याने शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे़ त दुसरीकडे धान पिकालाही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे परिसरात दिसून येत आहे़
पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांच्या बांधावर जावून कृषीवर आधारीत शासकीय योजनांची माहिती आणि पिकाची सध्य:स्थिती पाहायची भूमिका कृषी विभागाची आहे. परंतु शेतात कापसाचे झाडे फळे धारण केलेल्या अवस्थेत गारपीठीने खाली कोसळली़ आता परतीच्या पावसामुळे तयार झालेल्या कापसाला झाडावरच नवीन रोपे उगवू लागले. त्यामुळे कृषी विभागाने याबाबत तातडीने मार्गदर्शन् करावे, अशी मागणी सरपंच मारोती आत्राम यांनी तहसीलदार व कृषी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ शिवाय, नुकसान पीक विमा लागू करण्याची मागणी केली. परंतु शासनाकडून कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. या वर्षी कापसाला सुरवातीच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस आल्याने झाडे गेल्या २५ ते ३० वर्षांच्या तुलनेत अतिशय चांगली वाढ झाली़ भरपूर उत्पन्न होणार होते. परंतु हातात येणारे पीक परतीच्या पावसामुळे पूर्णत: ओले झाले़ त्यामुळे झाडावर कापसातील बीज फुटून रोपे उगवू लागले आहे.
सुरुवातीच्या पावसामुळे कापसाचे झाडे आजपर्यंत कधी नव्हते तेवढे उंच वाढल़े परंतु परिसरात परतीचा पाऊस बरसल्याने हाती आलेले पीक वाया जाण्याच्या स्थितीत आहे़ कपासीच्या बियाणांना रोपे उगवत आहेत़ यातून शेतकºयांचे प्रचंड नुकसान होते़ तहसीलदार व कृषी अधिकाºयांनी शेतशिवाराची पाहणी करून भरपाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा़
- मारोती आत्राम,सरपंच, सुब्बई