मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 07:35 PM2018-10-26T19:35:55+5:302018-10-26T20:08:14+5:30

मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीविषयी माहिती जाहीर करण्यासाठी काँग्रेसने भाजपाला चार दिवसांची मुदत दिली असून, अन्यथा काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशी करावी अशी मागणी करील, असे त्यांनी सांगितले. 

Show Manohar Parrikar being alive; Otherwise ... Goa Congress challenge to BJP | मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान

मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान

Next

 पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे हयात असल्याचे दाखवा, न पेक्षा श्राध्द घाला, असे आव्हान काँग्रेसचे माजी आमदार तथा प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी दिले आहे. पर्रीकरांच्या प्रकृतीविषयी माहिती जाहीर करण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली असून अन्यथा काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशी करावी अशी मागणी करील, असे त्यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेत देशप्रभू म्हणाले की, ‘पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळातून स्ट्रेचरवरुन गोव्यात आणले ते पाहता त्यांच्या प्रकृतीविषयी सर्वांनाच संशय आहे. सरकारने त्यांच्या आरोग्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पर्रीकर जर खरोखरच सुस्थितीत असतील तर त्यांचा व्हिडिओ तरी जनतेसाठी प्रसारित करावा.’  

मंत्री विश्वजित राणे यानी पर्रीकरांच्या आरोग्याविषयी बोलण्याचा अधिकार हा त्यांच्या कुटुंबियांचाच असल्याचे जे विधान केले होते त्याचााही देशप्रभू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. पर्रीकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या प्रकृतीबाबतचे अधिकृत विधान सरकारकडून यायला हवे. त्यांच्या कुटुंबियांना हा अधिकार दिला कोणी?, असा सवाल त्यांनी केला. 

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रीकर हे लवकरच कामावर रुजू होणार असल्याचे जे भाष्य केले होते त्यावरही देशप्रभू यांनी टीका केली. गेल्या मार्चपासून अशाच प्रकारची विधाने भाजपकडून येत आहेत. ही खोटारडेपणाची विधाने असून भाजप खोटारडेपणाचा महामेरु बनला आहे, अशीही टीका त्यांनी केली. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अधिकारांचा गैरवापर करीत आहेत, असा आरोप करुन देशप्रभू म्हणाले की, विविध खात्याचे संचालक तसेच अधिका-यांना खुश ठेवण्यासाठी आदेश काढले जातात. ज्या ज्या खात्यांमधून आदेश काढले गेलेले आहेत त्या त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या सहीचा नोट खात्याकडे पोचला होता की त्यांचे नाव घेऊन मधल्या मध्ये आणखी कोणी घपला करीत आहे हे स्पष्ट व्हायला हवे, असे देशप्रभू म्हणाले. 

Web Title: Show Manohar Parrikar being alive; Otherwise ... Goa Congress challenge to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.