49 years of Amitabh Bachchan : ​ बहुतेरे दाग छिड़काए गए बरसों मुझ पर...! अमिताभ बच्चन यांचे टीकाकारांना असेही उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 08:25 AM2018-02-15T08:25:11+5:302018-02-15T13:55:11+5:30

४९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वयाच्या २६ व्या वर्षी अमिताभ यांनी आपला पहिला सिनेमा साईन केला होता. या सिनेमाचे नाव होते, ‘सात हिंदुस्तानी’.

49 years of Amitabh Bachchan: Many spots sprinkled on me ...! Amitabh Bachchan's reply to commentators! | 49 years of Amitabh Bachchan : ​ बहुतेरे दाग छिड़काए गए बरसों मुझ पर...! अमिताभ बच्चन यांचे टीकाकारांना असेही उत्तर!

49 years of Amitabh Bachchan : ​ बहुतेरे दाग छिड़काए गए बरसों मुझ पर...! अमिताभ बच्चन यांचे टीकाकारांना असेही उत्तर!

googlenewsNext
वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलिवूडमध्ये एका महानायकाचा जन्म झाला होता. होय, हा महानायक कोण, तर महानायक अमिताभ बच्चन. आज (१५ फेबु्रवारी २०१८) रोजी अमिताभ यांना इंडस्ट्रीत ४९ वर्षे पूर्ण झालीत. ४९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वयाच्या २६ व्या वर्षी अमिताभ यांनी आपला पहिला सिनेमा साईन केला होता. या सिनेमाचे नाव होते, ‘सात हिंदुस्तानी’. 
आज आपल्या सोशल अकाऊंटवर अमिताभ यांनी त्या पहिला दिवसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या. आपल्या फिल्मी करिअरमध्ये अमिताभ यांनी अनेक चढ ऊतार बघितले. एकेकाळी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत तर एक वेळ अशीही आली, जेव्हा निर्मात्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.  एकीकडे जीव ओवाळून टाकणारे  चाहते तर दुसरीकडे तितकेच टोकाचे टीकाकार ही विसंगतीही या महानायकाने अनुभवली. आज इंडस्ट्रीत ४९ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओत त्यांनी नेमक्या याच विसंगतीवर भाष्य करत आपले चाहते व टीकाकारांना उद्देशून एक कविता म्हटली आहे. 

बहुतेरे दाग छिड़काए गए बरसों मुझ पर, दोषी, 
अपराधी, दंड बरसाए गए मुझ पर,
न छुआ शरीर के उन दागों को मैंने,
 न प्रयत्न किया धुलाई, लीपापोती की मैंने। 
समय बलवान होता है मेरे आलोचक, 
समय के साथ ही दृष्टि होती है रोचक, 
जिस दिन बदलेगा समझ जाओगे तुम, 
कौन कितने पानी में..प्रतिबिम्ब होगे तुम।  
क्षमा नहीं तब करूंगा तुमको मैं,
 यह शब्द निर्जीव है, इसका बहिष्कार करूंगा मैं।
गले लगा कर अपने ह्रदय का परिचय दूंगा मैं,
 धड़कनों को मिलाने का प्रयत्न करूंगा मैं।

असे या कवितेचे शब्द आहेत...



ALSO READ : ​जी हां जनाब मैं अस्पताल जाता हूँ...! रूग्णालयातून परतल्यावर अमिताभ बच्चन यांनी लिहिली कविता!!

अमिताभ यांच्या भारदस्त आवाजातील ही कविता म्हणजे, आजच्या दिवशी त्यांनी चाहत्यांना दिलेली एक अनमोल भेट आहे, असेच म्हणावे लागेल.   ही अनमोल भेट स्वीकारत, त्यांचा प्रवास असाच निरंतर चालत राहो, या शुभेच्छा देऊ यात.

Web Title: 49 years of Amitabh Bachchan: Many spots sprinkled on me ...! Amitabh Bachchan's reply to commentators!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.