सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट, बनला सर्वाधिक लोकप्रिय !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 11:01 AM2018-08-08T11:01:09+5:302018-08-09T07:15:00+5:30
अक्षय कुमारचा लवकरच गोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले.
यंदा फेब्रुवारी माहिन्यात रिलीज झालेल्या आपल्या पॅडमॅन सिनेमामुळे अक्षय कुमार स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला होता. त्यानंतर सहा महिन्यात बहुतेक आठवड्याच्या अखेरीस सलमान खानच नंबर वन स्थानी असल्याचं दिसून येतं होतं. मात्र आता सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा खिलाडी कुमारने बाजी मारली आहे.
आपल्या गोल्ड सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे अक्षय कुमार पून्हा एकदा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या माहितीनूसार, अक्षयकुमार 81 गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. तर दबंग खान 69 गुणांसह दुस-या स्थानी आणि अमिताभ बच्चन 67 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. किंग खान 37 गुणांसह चौथ्या स्थानी तर संजय दत्त 32 गुणांसह पांचव्या स्थानी आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात,, “जेव्हा जेव्हा अक्षयकुमारचा चित्रपट येतो, तेव्हा लोकप्रियतेमध्ये कोणी त्याला मागे टाकू शकत नाही, हे ह्या गोष्टीने सिध्द झालंय. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा अक्षयकुमारचा पॅडमॅन सिनेमा आला होता तेव्हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र खिलाडीकुमारच दिसत होता. आता सुध्दा जेव्हा गोल्ड चित्रपट रिलीज होतोय. सहा महिन्यांपासून जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये नंबर वन असलेल्या सलमान खानला त्याने मागे टाकले आहे.”
अश्वनी कौल पुढे म्हणतात, “गेल्या महिन्यात अक्षयकुमार प्रस्तुत मराठी फिल्म चुंबक रिलीज झाली. तेव्हा मराठी मीडियाच नाही तर हिंदी मीडियामध्येही अक्षयच्या ह्या मराठी सिनेमाची चर्चा होती. आणि गोल्ड सिनेमामुळे तर अक्षय फेसबुक, ट्विटर, वायरल न्यूज, वृत्तपत्र आणि डिजिटल साइट्स सर्वत्र लोकप्रिय आहेत.”
अक्षय कुमारचा लवकरच गोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. हीच कथा ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. सिनेमाच अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मौनी रॉय साकारणार आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.