गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत?

By सुवर्णा जैन | Published: June 30, 2018 04:24 PM2018-06-30T16:24:26+5:302018-06-30T19:00:00+5:30

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे.

Anushka sharma Spotted in simple pink saree on mumbai road, who was accompanied her? | गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत?

गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत?

मुंबई… धावणारी माणसं… प्रत्येक मुंबईकर घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. आपल्या कामात दंग असणाऱ्या मुंबईकराला कधीकधी काय सुरु आहे हेसुद्धा कळत नाही. याचीच प्रचिती काही दिवसांपूर्वी आली होती. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकात गल्ली बॉयज या सिनेमाचं शुटिंग पार पडलं होतं. यावेळी आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या काही सीन्सचं शुटिंग करण्यात आलं. आलिया आणि रणवीरला अगदी सर्वसामान्यांप्रमाणे वावरले. त्यामुळे लगेचच त्यांना कुणीही ओळखू शकलं नाही. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी आश्चर्याचा सुखद धक्का दिला तो अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांनी.या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सुई धागा : मेड इन इंडिया' या सिनेमाचं शुटिंग मुंबईतील रस्त्यावर पार पडलं. अनुष्का आणि वरुण यांच्या काही सीन्सचं शुटिंग यावेळी पार पडलं. या शुटिंग दरम्यान अनुष्का एका गुलाबी रंगाच्या फुलांची नक्षी असलेल्या साध्या साडीत पाहायला मिळाली. तिच्या खांद्यावर एक सामानाची बॅग तर दुसऱ्या हातात पर्स होती. या रुपात अनुष्काला क्षणभर कुणीच ओळखू शकलं नाही. यावेळी वरुणनं चेक्स असलेला शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. त्याचाही लूक अतिशय साधा असल्याचे दिसून आले. या दोघांनाही काही काळ कुणीच ओळखलं नाही. याआधी भोपाळ आणि नजीकच्या परिसरातही या सिनेमाचे शुटिंग झाले होते. 

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे. सुई धागा या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे. 'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. 


 

Web Title: Anushka sharma Spotted in simple pink saree on mumbai road, who was accompanied her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.