birthday special : हिरा व्यापा-याची मुलगी आहे ‘बाहुबली’ची अभिनेत्री तमन्ना भाटिया!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 09:09 AM2017-12-21T09:09:58+5:302017-12-21T14:39:58+5:30
आधी साऊथ आणि मग बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा आज (२० ...
आ ी साऊथ आणि मग बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा आज (२० डिसेंबर) वाढदिवस. आज २८ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटातून तिने अॅक्टिंग डेब्यू केला होता.अर्थात तमन्नाचा हा चित्रपट दणकून आपटला होता. यानंतर तमन्ना काही व्हिडिओ अल्बममध्ये दिसली आणि नंतर तेलगू व तामिळ चित्रपटांकडे वळली. २००५ मध्ये तिने ‘श्री’ या चित्रपटात काम केले. यानंतर एकापाठोपाठ एक तामिळ चित्रपटांनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज तमन्ना साऊथची एक मोठी स्टार म्हणून ओळखली जाते.
तमन्नाच्या वडिलांचे नाव संतोष भाटिया आहे. त्यांचा हि-यांचा व्यापार आहे. १३ वर्षांची असताना तमन्ना आपल्या शाळेच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये परफॉर्म करत होती. तेव्हा तिला चित्रपटाची आॅफर मिळाली होती.
यानंतर तमन्ना मुंबईत आली. एक वर्षे तिने पृथ्वी थिएटरमध्ये काम केले. काही काळ मॉडेलिंगही केली. काही जाहिरातीही तिने केल्या. २०१६ मध्ये ती भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी बढाओ’ योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर बनली.
२०१३ मध्ये तमन्ना साजिद खान यांच्या ‘हिम्मतवाला’मधून तमन्नाने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या चित्रपटात तिच्या अपोझिट होता अजय देवगण. ‘हिम्मतवाला’ हा तमन्नाचा बॉलिवूड डेब्यू असल्याचे त्यावेळी साजिद खान यांनी जाहिर केले होते. पण ‘चांद सा रोशन चेहरा’मधून तमन्ना त्यापूर्वीचं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून चुकली होती.
ALSO READ : अनुष्का शर्मासह लव्ह स्टोरी सुरु होण्याआधी बॉलिवूडच्या 'या' दोन हिरोईनसोबत होतं विराट कोहलीचं 'अफेअर'
२०१४ मध्ये साजिद यांच्याच ‘हमशकल्स’मध्ये तमन्ना लीड रोलमध्ये दिसली. पण तमन्नाचे हे दोन्ही बॉलिवूडपट फ्लॉप ठरलेत. यानंतर तमन्ना ‘तूतक तूतक तूतिया’मध्ये दिसली. पण हा चित्रपट सुद्धा अपयशी ठरला. पण हिंदी भाषेत डब केलेल्या ‘बाहुबली: दी बिगिनिंग’ने बॉक्सआॅफिस यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले. अर्थात तांत्रिकदृष््ट्या तमन्नाचा हा हिंदी चित्रपट होता, असे म्हणता येणार नाही.