birthday special : इतक्या वर्षांत इतकी बदलली, सलमान खानची हिरोईन रंभा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2017 08:57 AM2017-06-05T08:57:41+5:302017-06-05T14:27:41+5:30
नव्वदीच्या दशकातील अनेक अभिनेत्री कमालीच्या लोकप्रीय झाल्यात आणि मग काळासोबत बॉलिवूडमधून दिसेनाशा झाल्यात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रंभा. १९९७ ...
न ्वदीच्या दशकातील अनेक अभिनेत्री कमालीच्या लोकप्रीय झाल्यात आणि मग काळासोबत बॉलिवूडमधून दिसेनाशा झाल्यात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रंभा. १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ चित्रपटातील सलमान खानची हिरोईन रंभा. आज (५ जून) रंभाचा वाढदिवस आहे. रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या बड्या स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून तर अजय देवगणपर्यंत अनेक हिरोंसोबत ती दिसली.
कमी चित्रपट करूनही रंभाचे असंख्य चाहते आहे. आताश: रंभाने चित्रपटांत काम करणे सोडलेयं. लग्न केल्यानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, हीच ती सलमानची हिरोईन रंभा, हे सांगूनही पटणार नाही.
चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर ८ एप्रिल २०१० रोजी रंभाने बिझनेसमॅन इंद्राण पद्मनाथनसोबत लग्न केले. रंभाला दोन मुली आहेत. लान्या आणि साशा. २०११ मध्ये लान्याचा जन्म झाला तर २०१५ मध्ये साशा जन्मली. सोशल मीडियावर रंभा कमालीची अॅक्टिव्ह आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर ती आपले व कुटुंबाचे अनेक फोटो शेअर करत असते. रंभाचा पती मॅजिकवुड्स नामक कंपनीचा चेअरमन व सीईओ आहे. कॅनडास्थित ही कंपनी किचन कॅबिनेट आणि व्हॅनिटी व्हॅन बनवते.
रंभाने वयाच्या सोळाव्या वर्षी आपला पहिला चित्रपट साईन केला होता. १९९५ मध्ये ‘जल्लाद’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड एन्ट्री घेतली. यानंतर ‘दानवीर’,‘जंग’,‘कहर’,‘जुडवां’,‘सजना’,‘घरवाली बाहरवाली’,‘बंधन’,‘मैं तेरे प्यार में पागल’,‘क्रोध’,‘बेटी नंबर वन’,‘दिल ही दिल में’,‘प्यार दिवाना होता है’ अशा अनेक चित्रपटांत रंभा दिसली. एकेकाळी रंभाला दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणून ओळखले जात होते. इतक्या वर्षांत रंभा किती बदलली, हे पाहा तिच्या काही फोटोंवरून.