कशी आहे सोनाली बेंद्रेची प्रकृती? नणंदेने दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:43 AM2018-07-31T11:43:27+5:302018-07-31T11:44:52+5:30

न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची प्रकृती आता कशी आहे? याचे उत्तर सोनालीच्या मुलाच्या ताज्या फोटावरून मिळू शकते.

Cancer-stricken Sonali Bendre's son Ranveer recently posted a picture with his best friend in New York | कशी आहे सोनाली बेंद्रेची प्रकृती? नणंदेने दिले उत्तर!!

कशी आहे सोनाली बेंद्रेची प्रकृती? नणंदेने दिले उत्तर!!

googlenewsNext

न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची प्रकृती आता कशी आहे? याचे उत्तर सोनालीच्या मुलाच्या ताज्या फोटावरून मिळू शकते.
सोनालीची नणंद सृष्टी आर्याने सोनालीचा मुलगा रणवीरचा एक फोटो पोस्ट केला आहे. न्यूयॉर्कमध्ये क्लिक करण्यात आलेल्या या फोटोत रणवीर बराच आनंदी दिसतोय. 

रणवीरच्या चेहऱ्यावरचे हास्य बरेच काही सांगणारे आहे. त्याच्या चेह-यावरचे हे हास्य पाहता, सोनालीची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचे मानले जात आहे. सोनालीच्या प्रकृतीबद्दल सृष्टीने spotboye.com  ला माहिती दिली आहे. सोनालीच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळाने सृष्टीला मॅसेज केला होता. या मॅसेजला उत्तर देताना, सोनालीची प्रकृती आता पूर्वीपेक्षा अधिक चांगली असल्याचे, सृष्टीने म्हटले आहे. सोनाली खूप खंबीर आहे, असेही तिने म्हटले आहे. तिचे हे उत्तर सोनालीच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा देणारे आहे.

 काही दिवसांपूर्वी सोनालीने रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. माझा १२ वर्षे ११ महिने आणि ८ दिवसांच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेही गरजेचे होते. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला/ आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो, असे सोनालीने लिहिले होते. 

 

Web Title: Cancer-stricken Sonali Bendre's son Ranveer recently posted a picture with his best friend in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.