'या' देशात सुरु आहे 'हाउसफुल-4'चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:20 AM2018-07-10T10:20:09+5:302018-07-10T10:23:27+5:30

साजिद नाडियाडवाला निर्मित हाउसफुल्ल 4'चे शूटिंग नुकतेच सुरु करण्यात आले. पुढील काही दिवसा या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये होणार आहे.

'This is the country' 'Housefull 4' shoot | 'या' देशात सुरु आहे 'हाउसफुल-4'चे शूटिंग

'या' देशात सुरु आहे 'हाउसफुल-4'चे शूटिंग

googlenewsNext
ठळक मुद्दे हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित हाउसफुल्ल 4'चे शूटिंग नुकतेच सुरु करण्यात आले. पुढील काही दिवसा या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. अक्षय कुमार आणि बॉबी देओलने फोटो शेअर केले आहेत.  अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे आणि कृति खरबंदा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. 


या कलाकरांसोबत यात संजय दत्तचे नाव ही 'हाउसफुल-4' साठी चर्चेत होते. संजय यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जाते होते. मात्र बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार संजय दत्त 'हाउसफुल 4' मध्ये दिसणार नाहीय. चित्रपटाचे निर्माते सतत यासंदर्भात संजूबाबाशी चर्चा करत होते मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. संजय दत्त यांच्या जागेवर आता यात नाना पाटेकर दिसणार आहेत.

 हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट दोनशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी हॉलिवूड येथून वीएफएक्स टीमलाही बोलावण्यात आले आहे. 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: 'This is the country' 'Housefull 4' shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.