Gold Trailer :​ अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चा ट्रेलर एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:19 AM2018-06-25T11:19:20+5:302018-06-25T11:20:19+5:30

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमची छाती देशाभिमानाने फुलून ...

Gold Trailer: Akshay Kumar's 'Gold' trailer once seen !! | Gold Trailer :​ अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चा ट्रेलर एकदा पाहाच!!

Gold Trailer :​ अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चा ट्रेलर एकदा पाहाच!!

googlenewsNext
लिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमची छाती देशाभिमानाने फुलून आल्याशिवाय राहणार नाही. ‘गोल्ड’ हा हॉकीवर आधारित चित्रपट आहे.  स्वतंत्र देशाच्या रूपात भारताने आॅलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. आॅलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न असलेल्या भारतीय हॉकी टीमच्या खेळाडूंची गोष्ट आहे. यात अक्षय कुमार हॉकी कोचच्या भूमिकेत आहे.   ट्रेलरमध्ये मौनी राय हिचीही एक झलक पाहायला मिळते आहे. हा ट्रेलर तुम्हाला ‘चक दे’ची आठवण करून देतो. कारण चित्रपट हॉकीवर आहे. अर्थात ‘गोल्ड’ची फिलिंग पूर्णपणे वेगळी आहे.



 स्वातंत्र्यानंतरची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात अक्षय चांगलाच जमून आला आहे. १९३७ मध्ये सुरू झालेला हॉकीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी भारतीय हॉकी टीमला १२ वर्षांचा काळ लागला. १२ आॅगस्ट १९४८ रोजी भारताने स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात हॉकीचे पहिले सुवर्णपदक मिळवले होते. यापूर्वी भारताने जी काही पदके जिंकली ती सगळी ब्रिटीश इंडियाच्या नावावर मिळत होती. 
येत्या १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होत आहे. रिमा कागती यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे. त्याच या चित्रपटाच्या दिग्दर्शक आहेत. यापूर्वी रीमान तलाश  व  हनिमून ट्रव्हलर्स प्रायव्हेट लिमिटेडह्ण  यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांच्या  एक्सेल इंटरटेनमेंट च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. 

Web Title: Gold Trailer: Akshay Kumar's 'Gold' trailer once seen !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.