चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘हिंदी मीडियम2’साठी इरफान खानचा होकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:28 PM2018-08-20T20:28:41+5:302018-08-20T20:29:17+5:30

‘हिंदी मीडियम’चा सीक्वल  म्हणजेच ‘हिंदी मीडियम2’मध्ये इरफान दिसणार आहे. 

 Good news for fans! Irrfan Khan gives his nod to star in Hindi Medium 2 | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘हिंदी मीडियम2’साठी इरफान खानचा होकार!!

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘हिंदी मीडियम2’साठी इरफान खानचा होकार!!

googlenewsNext

इरफान खानला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि अख्खे बॉलिवूड सुन्न झाले. इरफानने स्वत: ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. चाहत्यांनाही ही बातमी धक्का देऊन गेली. सध्या इरफान लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतोय. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर इरफानने दोन प्रोजेक्टमधून स्वत:हून अंग काढून घेतले. होय, विशाल भारद्वाज यांचा चित्रपट त्याने सोडला. तशीच Gormint ही वेबसीरिजही सोडली. या बातमीने चाहत्यांनी प्रचंड निराशा झाली होती. पण आता इरफानच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हिंदी मीडियम’चा सीक्वल  म्हणजेच ‘हिंदी मीडियम2’मध्ये इरफान दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी त्याने होकार दिल्याचे कळतेय़. इरफानची प्रकृती वेगाने सुधारतेय, असा या बातमीचा अर्थ काढला जातोय.

इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेबु्रवारी २०१८ मध्येचं ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहिर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर मेकर्सनी इरफारनकडे या चित्रपटाचा विषयही काढला नव्हता. आता इरफानच्या प्रकृतीत सुधारणा होताच, मेकर्सनी अलीकडे त्याची भेट घेतली. या भेटीत स्क्रिप्टवर चर्चा झाल्याचे कळते़ इरफानच्या चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी कुठली बरी असू शकते.

इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. 

 

Web Title:  Good news for fans! Irrfan Khan gives his nod to star in Hindi Medium 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.