फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना साकारणार जान्हवी कपूर, पाहा तिचा बिनधास्त अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:38 PM2018-12-26T17:38:22+5:302018-12-26T17:45:21+5:30

'धडक' चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Janhavi Kapoor first look as shaurya chakra awardee first female pilot gunjan saxena | फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना साकारणार जान्हवी कपूर, पाहा तिचा बिनधास्त अंदाज!

फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना साकारणार जान्हवी कपूर, पाहा तिचा बिनधास्त अंदाज!

ठळक मुद्देजान्हवी यात गुंजन सक्सेना यांची मुख्य भूमिका साकारणार आहे या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहे

'धडक' चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचे अभिनय कौशल्य पाहून एक वर्षात तिला तीन आव्हानात्मक भूमिका मिळाल्या.  धडकनंतर ती  मल्टीस्टारर तख्तमध्ये दिसणार आहे. मात्र त्याआधी जान्हवीने लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्टलूक आऊट झाला आहे.  जान्हवी यात गुंजन सक्सेना यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहे. 


कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैनिकांवर निशाना साधण्यात येत असताना गुंजन यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या भागातून विमान उडवत सैनिकांनी सुरक्षितरित्या त्या भागातून बाहेर काढले होते. अशा शूर महिलेची भूमिका जान्हवी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  

 

 
'तख्त'बाबात बोलायचे झाले तर  हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. नुकतीच जान्हवी करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये दिसली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील व करियरबाबत गोष्टी शेअर केल्या होत्या.
 

Web Title: Janhavi Kapoor first look as shaurya chakra awardee first female pilot gunjan saxena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.