‘धडक’ या चित्रपटाचे गाणे ‘पहली बार’ तुम्ही पाहिले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 18:56 IST2018-07-05T18:55:54+5:302018-07-05T18:56:23+5:30
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पहली बार’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ऐकले की, ‘सैराट’च्या ‘याडं लागलं... ’ या गाण्याची हटकून आठवण होते.

‘धडक’ या चित्रपटाचे गाणे ‘पहली बार’ तुम्ही पाहिले?
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पहली बार’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ऐकले की, ‘सैराट’च्या ‘याडं लागलं... ’ या गाण्याची हटकून आठवण होते. कारण ‘धडक’चे हे गाणे ‘याडं लागलं... ’ ची हुबेहुब कॉपी वाटते. चाल तीच, संगीत तेच, केवळ शब्द बदलेले असे ‘पहली बार’ गाणे अजय-अतुलने संगीतबद्ध केले असून अतुलने गायलेले आहे. अमिताभ भट्टाचार्य याचे शब्द असलेले हे गाणे पहिल्या प्रेमाचा अनुभव देणारे आहे, हे सांगणे नकोच.
ईशान आणि त्याच्या प्रेयसीच्या रूपातील जान्हवी या दोघांचीही केमिस्ट्री अफलातून आहे. गाण्यात ‘सैराट’च्याच अनेक सीन्सची जशीच्या तशी कॉपी करण्यात आली आहे. फक्त अंदाज तेवढा वेगळा आहे. जान्हवीच्या प्रेमात बुडालेला ईशान उंचीवरून पाण्यात उडी घेतो आणि मग जान्हवी त्याला ‘चल बाहर निकल’ म्हणून बजावते. ईशान तरीही ऐकत नाही म्हटल्यावर, ‘यू नो इंग्लिश, गो आऊट’ म्हणून त्याला बाहेर जाण्यास सांगते. हा सीन मनाला भावतो.
येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सुपरडुपर हिट मराठी चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक असल्याने साहजिकचं मेकर्सला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहे.
याआधी या चित्रपटाचे टायटल साँग रिलीज झाले होते. त्या गाण्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता हे गाणे चाहते किती डोक्यावर घेतात, ते बघूच.