करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरिज’मधील या कारनाम्यामुळे नाराज झाले लता मंगेशकर कुटुंब!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:51 AM2018-06-24T10:51:03+5:302018-06-24T10:51:03+5:30
करण जोहरने ‘लस्ट स्टोरिज’ची घोषणा केली, अगदी तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची ...
क ण जोहरने ‘लस्ट स्टोरिज’ची घोषणा केली, अगदी तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही यातील कलाकारांच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा होत आहे. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी समोर आली आहे. होय, करण जोहरने ‘लस्ट स्टोरिज’मधील आपल्या कथेतील शेवटच्या दृश्यात ‘कभी खुशी कभी गम’चे टायटल साँन्ग वापरले आहे. करण जोहरच्या कथेतील क्लायमॅक्स आणि त्यातले हे गाणे अनेकांना एक गजब कल्पना वाटतेय, तर अनेकांना ही कल्पना जराही पचलेली नाही. यात सगळ्यांत वरचे नाव आहे ते, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाचे. लता मंगेशकर यांचे कुटुंब सध्या यामुळे करणवर नाराज असल्याचे ऐकिवात येत आहे.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील एका सदस्याने आपली ही नाराजी बोलून दाखवली. ‘करण जोहरला एका भजनसदृश गाण्याला या सीनमध्ये वापरण्याची गरजचं का पडली, हे आमच्यासाठी एक कोडेच आहे. या गाण्याऐवजी करण जोहर दुसरे कुठलेही गाणे वापरू शकला असता. करणने या गाण्याला कशा पद्धतीने वापरले, हे लतादीदी ज्या वयात आहे, त्या वयात आम्ही त्यांना सांगूही शकत नाही. त्यांना कळावे, अशी आमची इच्छाही नाही. दीदींनी करणच्या ‘कभी खुशी कभी गम’चे हे गाणे रेकॉर्ड केले होते. त्यावेळी करण प्रचंड खूश झाला होता. कारण आपल्या चित्रपटासाठी लता दीदींनी गावे, हे त्याचे स्वप्न होते. त्याने स्वत: लता दीदींसमोर या भावना व्यक्त केल्या होत्या आणि आज त्याने लता दीदींनी गायलेल्या गाण्यासोबतचं हे सगळे केले. त्याचा नको तेथे वापर केला, असे मंगेशकर कुटुंबातील या सदस्याने म्हटले.
ALSO READ : स्वरा भास्करचं नाही, आता कियारा अडवाणीही झाली ‘बोल्ड’!!
करणच्या ‘लस्ट स्टोरिज’मधील या सीनमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी मास्टरबेशन करताना दिसतेय. या सीनमध्ये.‘कभी खुशी कभी गम’च्या गाण्याचा वापर केला आहे. ‘लस्ट स्टोरिज’ हा अनुराग कश्यप, जोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी व करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेल्या चार शॉर्टफिल्मचे संकलन आहे. केवळ नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज केली गेली आहे. लग्नापूवीर्चे अफेअर, लग्नानंतरचे अफेअर, लाँग डिस्टंट रिलेशनशिप आणि लिव्ह इन अशा अनेक बाबतीत पुरूष आणि महिलांच्या नात्यांत महिलांचा दृष्टिकोण यात मांडला गेला आहे