पाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 08:45 AM2018-08-19T08:45:36+5:302018-08-19T08:49:27+5:30
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर ‘पर’देसी गर्ल झालीचं. काल प्रियांका चोप्रा व अमेरिकन सिंगर निक जोनास यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर ‘पर’देसी गर्ल झालीचं. काल प्रियांका चोप्रा व अमेरिकन सिंगर निक जोनास यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. प्रियांकाच्या मुंबईतील घरी प्रियांका व निकचा ‘रोका’ पार पडला. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते.
यावेळी प्रियांका व निक दोघेही भारतीय पारंपारिक वेशभूषेत दिसले. ‘रोका’ सेरेमनीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. स्वत: प्रियांका आणि निक या दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली.
‘माझं मन आणि आत्मा तुझ झालयं,’ असे लिहित प्रियांकाने निकसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. निकनेही ‘या आहेत भावी मिसेस जोनास...’ असे लिहित, प्रियांकासोबतचा तोच सुंदर फोटो शेअर केला.
‘रोका’ सेरेमनीचा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला. पण तरीही या सोहळ्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
प्रियांकाने तिची स्टाईलिश प्रियंका बोरकारसोबत असा फोटो क्लिक केला.
आंत्रपिन्योर अंजुला अचारिया आणि मनीष के. गोयल, शिवाय व्हीजे अनुषासोबत प्रियांका.
‘रोका’नंतर प्रियांका व निकने एक ग्रॅण्ड पार्टी दिली़ या पार्टीत बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी आवर्जुन हजर होते.
सलमान खानची बहीण अर्पिता खान पती आयुष शर्मासोबत या पार्टीत दिसली.
मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत या पार्टीत सामील झालेत.
आलिया भट्ट ही सुद्धा अतियश स्टाईलिश अंदाजात यावेळी दिसली.