​ मल्लिका शेरावत परतणार, बनणार ‘द गुड वाईफ’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 09:37 AM2018-06-22T09:37:38+5:302018-06-22T15:08:02+5:30

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. केवळ बॉलिवूडचं नाही तर मल्लिका ब-याच दिवसांपासून हॉलिवूडपासूनही दूर आहे. पण आता मल्लिका परतणार आहे.

Mallika Sherawat to return, be 'The Good Wife' !! | ​ मल्लिका शेरावत परतणार, बनणार ‘द गुड वाईफ’!!

​ मल्लिका शेरावत परतणार, बनणार ‘द गुड वाईफ’!!

googlenewsNext
िनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. केवळ बॉलिवूडचं नाही तर मल्लिका ब-याच दिवसांपासून हॉलिवूडपासूनही दूर आहे. पण आता मल्लिका परतणार आहे. होय, हॉलिवूडचा लोकप्रीय क्राईम व पॉलिटिकल ड्रामा ‘द गुड वाईफ’मध्ये मल्लिका दिसणार आहे. यात ती लीड रोलमध्ये दिसेल. साहजिक सध्या मल्लिकाच्या आनंदाला उधाण आले आहे.पण एक मिनिट थांबा, यापुढे आणखीही एक बातमी आहे. होय, मल्लिका स्वत:च हा शो प्रोड्यूस करणार आहे. यात ती एलिसिया फ्लोर्रिकची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एकंदर काय, तर या चित्रपटात मल्लिकाचाच पैसा अन् मल्लिकाचं हिरोईन असणार आहे.



हा शो भारतीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे. तूर्तास या शोसाठी उर्वरित कास्ट व क्रूची निवड करण्यात येत आहे.  या शोबद्दल मल्लिका प्रचंड उत्साहित आहे. मी ‘द गुड वाईफ’ भारतात आणून प्रचंड उत्साहित आहे. सीबीएसचे आभार की, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मला हा शो प्रचंड आवडतो़ याची कथा प्रचंड शानदार आहे, असे मल्लिका म्हणाली.
 
 ‘द गुड वाईफ’ने आपल्या प्रसारणादरम्यान जबरदस्त फॅन फॉलोर्इंग मिळवले होते. शिवाय पाच एमी अवार्डसमवेत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही जिंकले. हा थ्रीलर शो २००९ ते २०१६ दरम्यान प्रसारित झाला होता. हा शो कुक काऊंटी राज्याच्या अ‍ॅटर्नीची गृहिणी पत्नी एलिसिया फ्लोर्रिकची कथा आहे. पती सेक्स आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात फसल्यानंतर एलिसिया लॉ प्रॅक्टिसकडे वळते़ सोशल मीडिया आणि इंटरनेटवर या शोने प्रचंड धूम केली होती. राजकारण, समाजकारण आणि कायदा क्षेत्रावर याचा मोठा प्रभाव राहिला होता. या शोने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

Web Title: Mallika Sherawat to return, be 'The Good Wife' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.