‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 07:28 PM2018-10-02T19:28:12+5:302018-10-02T19:30:46+5:30

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. हा टीजर पाहून अनेकांनी कंगनाचे कौतुक केले. पण अनेकांना तो तेवढाच खटकलाही.

Manikarnika scene featuring Kangana Ranaut has become a hilarious meme | ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!

‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!

कंगना राणौतचामणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. हा टीजर पाहून अनेकांनी कंगनाचे कौतुक केले. पण अनेकांना तो तेवढाच खटकलाही. मग काय, नेहमीप्रमाणे कंगनाची खिल्ली उडवणा-या मीम्स आणि जोक्सला उधाण आले. अनेकांनी टीजरमधील कंगनाच्या चेह-यावरील एक्सपे्रशन्सची खिल्ली उडवली. केवळ इतकेच नाही तर अनेकांना कंगनाचे हे एक्सप्रेशन्स पाहून हृतिक रोशन आठवला.



 ‘ तुझ्या ३००० मेल्सकडे हृतिकने ढुंकूनही पाहिले नाही, असे कुणीतरी शूटींग करताना कंगनाच्या कानात सारखे पुटपुटले असावे ’, असे हृतिकच्या एका चाहत्याने लिहिले आहे. 




कंगना व हृतिक रोशन यांच्यातील जुना वाद उखरून काढण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. काही लोकांनी कंगनाच्या एक्सप्रेशन्सची खिल्ली उडवली.





लढाईच्या मैदानात कंगना इंग्रजांना आव्हान देत, ‘आझादी’चा नारा देतेय. यावरही एका युजरने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कंगना तू ‘आजादी’ म्हणतेय की ‘चाचाजी’ समजत नाहीय, असे या युजरने लिहिले.



अनेकांनी या चित्रपटाची तुलना ‘बाजीराव मस्तानी’शी केली.



मिस्टर बिनने मणिकर्णिका पाहिला तर त्याची रिअॅक्शन कशी असेल याचा एक व्हिडिओ एका नेटकऱ्याने शेअर केलाय.
आत्तापर्यंत ‘मणिकर्णिका’च्या टीजरवर ८ हजारांवर ट्विट केली गेली आहेत. यापैकी अनेक ट्विट मजेशीर आहेत. हे ट्विट तुमचेही मनोरंजन करेल, हे नक्की.

Web Title: Manikarnika scene featuring Kangana Ranaut has become a hilarious meme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.