#MeToo: तिच्याबद्दल मला खास आकर्षण होते...! चेतन भगतने मागितली ‘त्या’ तरूणीची माफी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 12:54 PM2018-10-07T12:54:48+5:302018-10-07T12:55:21+5:30
टू स्टेटस, थ्री मिस्टेक आॅफ माय लाईफ आणि वन इंडियन गर्लसारख्या पुस्तकाचा लेखक चेतन भगत याने एका तरूणीची जाहिर माफी मागितली आहे.
टू स्टेटस, थ्री मिस्टेक आॅफ माय लाईफ आणि वन इंडियन गर्लसारख्या पुस्तकाचा लेखक चेतन भगत याने एका तरूणीची जाहिर माफी मागितली आहे. होय, #MeTooया मोहिमेअंतर्गत एका तरूणीने सोशल मीडियावर चेतनसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. या स्क्रिनशॉट्मध्ये चेतन भगत, संबंधित तरूणीबदद्लचे अप्रत्यक्षपणे आकर्षण व प्रेम व्यक्त करताना दिसतोय.
And it goes on. Chetan Bhagat @chetan_bhagatpic.twitter.com/xyI9tSgfMc
— 🌈 Sheena (@weeny) October 6, 2018
संबंधित महिलेने व्हॉट्सअॅप चॅटींगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर अपलोड करताच, ते व्हायरल झालेत. यानंतर तासाभरातचं चेतन भगतने संबंधित तरूणीसोबतचे हे संभाषण खरे असल्याचे सांगत,तिच्याबद्दल एक वेगळेच आकर्षण होते, अशी कबुली दिली. शिवाय संबंधित तरूणीची माफीही मागितली. चेतन भगतने फेसबुकवर यासंदर्भात एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या स्क्रिनशॉट्सबद्दल मी माझे काही मुद्दे स्पष्ट करू इच्छित आहे. इथून चेतनने आपल्या पोस्टची सुरूवात केली आहे.
‘त्या घटनेबद्दल मला खेद आहे आणि सर्वप्रथम मी हे स्क्रिनशॉट शेअर करणाऱ्या व्यक्तीची माफी मागतो. हे स्क्रिनशॉट अनेक वर्षे जुने आहे. जिच्यासोबतचे हे संभाषण आहे, तिच्याबदद्ल मला आकर्षण होते. ती अतिशय खास वाटायची. ती विवाहित होती आणि अशा भावनांसह तिच्यासोबत असे कुठलेचं नाते तयार होऊ शकत नाही, हे मला ठाऊक होते. पण तरिही तिच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना होती. मी तिच्यासोबत माझ्या ‘वन इंडियन गर्ल’ या आगामी नॉवेलबद्दलही चर्चा केली होती. यावेळी आमच्यात एकमेकांकडे आकर्षित होणे आणि त्या भावनांबद्दलच्याही चर्चा झाल्या होत्या. माझ्यात आणि तिच्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते़ तिचा नंबरही मी डिलिट केला होता. अनेक वर्षांपासून मी तिला भेटलेलोही नाही,’असेही चेतन भगतने म्हटले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबद्दल पत्नी अनुषा हिचीही माफी मागितली आहे.