​नवाजुद्दीन सिद्दीकीने नाकारले एक्स गर्लफ्रेन्ड सुनीतासोबतचे रिलेशन; केला वेगळाच दावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 09:19 AM2017-12-19T09:19:03+5:302017-12-19T14:50:24+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ या बायोग्राफीवरून निर्माण झालेला सगळा वाद तुम्हाला माहित आहेच. या वादामुळेच प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ ...

Nawazuddin Siddiqui denies relationship with X girlfriends Sunita; Different claim! | ​नवाजुद्दीन सिद्दीकीने नाकारले एक्स गर्लफ्रेन्ड सुनीतासोबतचे रिलेशन; केला वेगळाच दावा!!

​नवाजुद्दीन सिद्दीकीने नाकारले एक्स गर्लफ्रेन्ड सुनीतासोबतचे रिलेशन; केला वेगळाच दावा!!

googlenewsNext
ाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ या बायोग्राफीवरून निर्माण झालेला सगळा वाद तुम्हाला माहित आहेच. या वादामुळेच प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ दिवसांत नवाजुद्दीनला ही बायोग्राफी बाजारातून मागे घ्यावी लागली होती. पूर्वप्रेयसींची माफी मागून नवाजने  ही बायोग्राफी बाजारातून मागे घेत असल्याचे जाहिर केले होते. ‘माझ्या बायेग्राफीमुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे त्याने म्हटले होते. पण  इतके करूनही  लोकप्रीय रंगभूमी कलाकार व टीव्ही अभिनेत्री सुनीता राजवार (नवाजची एक्स गर्लफ्रेन्ड) हिने याप्रकरणी नवाजला कायदेशीर नोटीस बजावले होते. त्यामुळे नवाजच्या बायोग्राफीचा वाद कोर्टात पोहोचला होता. आता कोर्टात पोहोचलेल्या या वादाने एक वेगळेच वळण घेतले आहे.   सुनीता राजवारने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देताना नवाजने वेगळाच दावा केला आहे. होय, माझ्या बायोग्राफीत ज्या सुनीता नावाच्या महिलेचा उल्लेख आहे, तो सुनीता राजवार हिच्याबद्दल नाहीच, असा दावा नवाजने केला आहे. नवाजच्या वकीलाच्या मते, सुनीता राजवार हिने फुकटची प्रसिद्धी लाटण्यासाठी केलेले हे सगळे  कारस्थान आहे.



दरम्यान सुनीताचे नवाजचा हा दावाही खोटा असल्याचे म्हटले आहे. नवाजने त्याच्या बायोग्राफीत उल्लेख केलेली सुनीता नावाची महिला मीच आहे. माझ्याकडे त्याचे अनेक पुरावे असल्याचा प्रतिदावा तिने केला आहे.  नवाजच्या बायोग्राफीत माझे आडनाव लिहिलेले नाही. पण सुनीता या महिलेबद्दल दिलेले सगळे संदर्भ ती सुनीता मीच आहे, हे दर्शवणारे आहेत. सुनीता ही एनएसडीच्या बॅचला होती, असे नवाजने म्हटले आहे. त्याच्यासोबत एनएसडीच्या बॅचला मीच होते. अन्य कुठलीही सुनीता नावाची मुलगी या बॅचला नव्हती. त्याने सुनीताचा उल्लेख ‘पहाडी गर्ल’ असा केला आहे. माझ्याशिवाय नवाजच्या त्या बॅचला कोणतीही दुसरी ‘पहाडी गर्ल’ नव्हती. सुनीता ही टेलिव्हिजन अ‍ॅक्ट्रेस अचिंत कौरची रूममेट होती, असे नवाजने लिहिलेले आहे.



मीच अचिंतची रूममेट होते. माझ्याशिवाय सुनीता नावाची तिची दुसरी कुठलीही रूममेट नव्हती, असे सुनीताने म्हटले आहे. एकंदर काय तर नवाज व सुनीता राजवार यांची कोर्टातील लढाई आता वेगळ्याच स्तराला पोहोचली आहे. ती पुढे कसे वळण घेते, ते बघूच.

ALSO READ : ​ नवाजुद्दीन सिद्दीकीला पहिल्या प्रेयसीने पाठवले कायदेशीर नोटीस!

आपल्या बायोग्राफीत नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन स्त्रियांचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल सविस्तर लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरिरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती.  निहारिकाबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे,असे नवाजने यात म्हटले होते.नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफ पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते.   नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. मी गरिब असल्याने सुनीताने मला सोडले, असे नवाजने बायोग्राफीत लिहिले होते. पण सुनीताने नवाजचा हा दावा फेटाळून लावला होता. 

Web Title: Nawazuddin Siddiqui denies relationship with X girlfriends Sunita; Different claim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.