प्रभासच्या ‘साहो’मध्ये नील नितीन मुकेश बनणार ‘बॅड बॉय’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 12:03 IST2017-05-31T06:33:03+5:302017-05-31T12:03:03+5:30
प्रभासच्या ‘साहो’मध्ये विलन कोण बनणार? प्रभासच्या तोडीला तोड, त्याच्या अॅक्शनचा डटून सामना करणारा असा कोण असणार? असे प्रश्न अनेकांना ...

प्रभासच्या ‘साहो’मध्ये नील नितीन मुकेश बनणार ‘बॅड बॉय’!!
प रभासच्या ‘साहो’मध्ये विलन कोण बनणार? प्रभासच्या तोडीला तोड, त्याच्या अॅक्शनचा डटून सामना करणारा असा कोण असणार? असे प्रश्न अनेकांना पडले होते. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. होय, चर्चा खरी मानाल तर ‘साहो’मध्ये नील नितीन मुकेशचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत आहे. नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात नीलची भूमिका अतिशय दमदार असणार आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभासही या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
![]()
सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये नील नितीन मुकेशची निगेटीव्ह भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. फिल्म मेकर्सलाही नीलची ही ‘बॅड बॉय इमेज’ आवडली आहे. त्यामुळेच बॉलिवूडसोबत साऊथच्या अनेक आॅफर्स त्याला येत आहे. प्रभासच्या ‘साहो’मध्ये वर्णी लागणे हे तर नीलसाठी मोठी संधी आहे. कारण या चित्रपटानंतर निश्चितपणे नीलची मार्केट व्हॅल्यू वाढणार आहे. नील सध्या मधूर भांडारकरच्या ‘इंदू सरकार’मध्ये बिझी आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत असलेल्या या चित्रपटात नील हा संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
ALSO READ : MUST READ : अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?
प्रभासबद्दल बोलायचे तर सध्या तो अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतोय. याठिकाणी काही नव्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचण्याचे काम तो करतो आहे.यापैकी काही स्क्रिप्ट प्रभासला आवडल्या असून यात एका बॉलिवूड चित्रपटाचाही समावेश असल्याचे कळतेय. अर्थात तूर्तास प्रभासने एकही चित्रपट साईन केलेला नाही. सुटीवरून परतल्यावर प्रभास ‘साहो’चे शूटींग पूर्ण करणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अनुष्का शेट्टी दिसणार असल्याची खबर आहे. निश्चितपणे प्रभाससोबत, अनुष्का व नीलला पाहायला आपल्यासोबतच आम्हीही उत्सूक आहोत.