दोनच दिवसांत ‘संजू’ने कमावले इतके कोटी, मोडला ‘रेस3’चा विक्रम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 07:37 PM2018-07-01T19:37:16+5:302018-07-01T19:42:39+5:30
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. होय, रिलीजनंतरच्या दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचे विक्रम मोडीत काढत ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. होय, रिलीजनंतरच्या दोन दिवसांत या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेत. केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.
अॅडव्हान्स बुकिंग आणि चित्रपटगृहांबाहेर लागलेले हाऊसफुलचे बोर्ड यावरून हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा ‘ओपनर’ ठरेल, याचा अंदाज आधीच आला होता. झालेही तसेच़ पहिल्याचं दिवशी या चित्रपटाने ३४.७५ कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने ३८.६० कोटी रूपय कमावलेत. म्हणजे पहिल्या दोन दिवसांतच ‘संजू’ने ७३.३५ कोटींचा गल्ला जमवला. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही आकडेवारी दिली आहे.
‘संजू’ने सलमान खानच्या ‘रेस3’चा सर्वात मोठा ‘ओपनर’चा विक्रम मोडीत काढला आहे. ‘रेस3’ने पहिल्या दिवशी २९़१७ कोटी कमावले होते़ तर दुस-या दिवशी ३८़१४ कोटींची कमाई केली होती.
‘संजू’ हा रणबीरच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. कारण हा चित्रपट रणबीरच्या आत्तापर्यंत आलेल्या चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा आरामात पार करेन, अशी शक्यता आहे. असे झाले तर तीन दिवसांत १०० कोटींचा पल्ला गाठणारा ‘संजू’ हा रणबीरच्या करिअरमधील कदाचित पहिला चित्रपट असेल.
चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाची तूर्तास जोरदार प्रशंसा होत आहे. समीक्षकचं नाही तर प्रेक्षकांनीही रणबीरच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा चालवली आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय परेश रावल, मनिषा कोईराला, सोनम कपूर, दीया मिर्झा, विकी कौशल, अनुष्का शर्मा हेही या चित्रपटात आहेत.