या कारणामुळे जावेद जाफरी वडील जगदीप यांचा करायचे तिरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 06:32 AM2017-12-04T06:32:41+5:302017-12-04T12:02:41+5:30
अभिनेता जावेद जाफरीचा ४ डिसेंबर हा वाढदिवस असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मेरी जंग, १०० ...
अ िनेता जावेद जाफरीचा ४ डिसेंबर हा वाढदिवस असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मेरी जंग, १०० डेज, ओह डार्लिंग ये है इंडिया, बूम, सलाम नमस्ते, ता रा रम पम, सिंग इज किंग, धमाल, डबल धमाल, थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला डान्सर आहे. त्याच्या नृत्य कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते. जावेद जाफरी हा अभिनेते जगदीप यांचा मुलगा असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. जगदीप हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
जावेद जाफरीचे वडील जगदीप हे बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध असले तरी जावेदने बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी कधीच त्याच्या वडिलांच्या म्हणजेच जगदीप यांच्या नावाचा वापर केला नाही. जावेदने त्याच्या अभिनयक्षमतेवर आज बॉलिवूडमध्ये त्याचे स्थान निर्माण केले आहे. जगदीपने बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी त्याच्या वडिलांची मदत न घेण्यामागे एक खास कारण आहे. जगदीप आणि जावेद यांच्या नात्यात अनेक वर्षं कटूता होती. जावेद जाफरी तरुण असताना तर त्याचे आणि जगदीप यांचे अजिबातच पटत नव्हते. काही वर्षांपूर्वी जगदीप प्रचंड दारू प्यायचे. तसेच त्यांना जुगारीचे व्यसन होते. या कारणांमुळे जावेद जाफरीला त्याच्या वडिलांविषयी प्रचंड राग होता. जावेदला जगदीप यांचे दारू पिणे आवडत नसल्याची कल्पना त्यांना असल्याने त्यांनी दारू सोडण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण काही काळानंतर ते पुन्हा प्यायला लागले. त्यामुळे त्यांच्या नात्यात अनेक वर्षं ताणतणाव होता. पण आता या दोघांमध्ये सगळे काही आलबेल आहे.
जगदीप यांनी बॉम्बे टू गोवा, अंदाज अपना अपना, कुरबानी, फिर वही रात, खिलोना, लैला मजनू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले या चित्रपटातील सुरमा भोपाली या त्यांच्या व्यक्तिरेखेचे चांगलेच कौतुक झाले होते. ते सध्या वृद्धापकाळामुळे चित्रपटात अभिनय करताना दिसत नाही. त्यांनी २००९ मध्ये लाइफ पार्टनर या चित्रपटात काम केले होते.