खुलासा! प्रियंका आणि निकला एकत्र आणण्यात 'रॉक' ठरला 'मॅचमेकर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:57 IST2018-07-12T15:51:58+5:302018-07-12T15:57:01+5:30
दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत. भारतातही दोघे एकत्र आले होते. आता दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत.

खुलासा! प्रियंका आणि निकला एकत्र आणण्यात 'रॉक' ठरला 'मॅचमेकर'
मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचं अफेअर सध्या सगळीकडेच गाजत आहे. हॉलिवूडमध्येही या दोघांच्या अफेअरची चर्चा होत आहे. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत. भारतातही दोघे एकत्र आले होते. आता दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत.
निक जोनसने त्याच्या एका पोस्टमध्ये प्रियंकाला अप्रत्यक्षपणे लग्नाबाबतही विचारले आहे. 'मुझसे शाही करोगी' असे त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले होते. पण हे दोघे एकत्र कसे आलेत याबाबत कुणालाही काही माहीत नाहीये. पण आता यावर हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन याने प्रतिक्रिया दिली आहे.
ड्वेन जॉनसन याने सांगतिले की, तो या प्रियंका आणि निक यांना एकत्र आणण्यास कारणीभूत आहे. ड्वेनला जेव्हा दोघांच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने प्रति प्रश्न करत विचारले की, 'काय ते खूश आहेत?'
त्यानंतर तो म्हणाला की, 'मी करून दाखवलं. ते दोघे खूश असतील तर चांगलंच आहे. याचं श्रेय मी घेतो. धन्यवाद ‘Baywatch’ and ‘Jumanji’.
खरंतर त्याने दोघांना एकत्र आणलं नाहीये. पण दोघांनीही ड्वेनसोबत काम केलंय. प्रियंकाने ड्वेनसोबत 'बे-वॉच' आणि निक जोनसने 'जुमांजी' सिनेमात काम केलं होतं. म्हणून त्याने गंमतीत अशी प्रतिक्रिया दिली.