‘संजू’ची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्सआॅफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:12 PM2018-07-03T13:12:01+5:302018-07-03T13:13:03+5:30
एका दिवसात सर्वाधिक कमाई करणा-या हिंदी चित्रपटात ‘संजू’ने बाजी मारली आहे. आधी हा रेकॉर्ड ‘बाहुबली2’च्या नावावर होता.
रणबीर कपूरच्या ‘संजू’ने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली आहे. केवळ कमाईचं नाही तर बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ सोबत ‘बाहुबली’ प्रभासलाही धूळ चारली आहे. बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या चारचं दिवसांत १४५.४१ कोटी रूपयांचा बिझनेस करत, सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
Non-holiday / working day... Reduced ticket rates on weekdays... Yet, #Sanju puts up a SPLENDID TOTAL on Day 4 [Mon]… This one is NOT going to slow down soon... Fri 34.75 cr, Sat 38.60 cr, Sun 46.71 cr, Mon 25.35 cr. Total: ₹ 145.41 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2018
रविवारी या चित्रपटाने ४६ कोटी ७१ लाख रूपये कमावले. अन् सोमवारी चौथ्या दिवशी २५.३५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवसाच्या कमाईवरूनच कुठल्याही चित्रपटाच्या लाईफटाईम बिझनेसचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्याअर्थाने ‘संजू’ने पहिल्या सोमवारची लिटमस टेस्ट पास केली आहे. पण ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांच्या मते, पहिल्या सोमवारचे आकडे बघूनही ‘संजू’च्या लाईफ टाईम कलेक्शनचा अंदाज बांधता येणार नाही. त्यांच्या मते, रणबीर कपूर व विकी कौशलचा हा चित्रपट ‘दंगल’ आणि ‘बाहुबली2’चा लाईफ टाईम कलेक्शनचा विक्रम मोडीत काढू शकतो. अर्थात‘संजू’च्या दुस-या आठवड्याचे कलेक्शन पाहिल्यानंतरच खात्रीपूर्वक बोलता येईल.
एक मात्र खरे, एका दिवसात सर्वाधिक कमाई करणा-या हिंदी चित्रपटात ‘संजू’ने बाजी मारली आहे. आधी हा रेकॉर्ड ‘बाहुबली2’च्या नावावर होता. ‘संजू’ने ‘पद्मावत’लाही मागे टाकले आहे. ‘पद्मावत’ने पेड प्रीव्ह्यूसह पाच दिवसांच्या वीकेंडमध्ये ११४ कोटी कमावले होते. ‘संजू’ने चारचं दिवसांत १४५.४१ कोटी कमावले आहेत.
तूर्तास ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी ‘संजू’ने ३४.७५ कोटी रूपये कमावले. दुस-या दिवशी ३८.६० कोटी, तिस-या दिवशी ४६.७१ कोटी तर चौथ्या दिवशी २५.३५ कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच गत चार दिवसांत या चित्रपटाने एकूण १४५.४१ कोटी रूपये कमावले.