शाहिद कपूरला करायचे नव्हते ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये काम! हे होते कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 21:43 IST2018-08-26T21:39:15+5:302018-08-26T21:43:25+5:30
अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. पण याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.

शाहिद कपूरला करायचे नव्हते ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये काम! हे होते कारण!!
अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. पण याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात काम करण्यास शाहिद आधी अजिबात तयार नव्हता. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. शाहिदने स्वत: पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. ‘अर्जुन रेड्डी’ची आॅफर माझ्याकडे आली, तेव्हा मी मनातून अजिबात तयार नव्हतो. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची गरजचं नाही, असे मला वाटत होते. ओरिजनल चित्रपटचं इतका परफेक्ट असताना कशाला हवा हिंदी रिमेक, असे मला वाटतं होते. पण यानंतर मी या चित्रपटाची स्क्रिप्ट मी वाचायला घेतली आणि त्यातील माझी भूमिका पाहून कधी एकदा हा चित्रपट करतो, असे मला झाले. कारण स्पष्ट होते, चित्रपटाची भूमिका कमालीची रोमांचक आणि उत्साहवर्धक होती. भूमिका अतिशय वास्तववादी होती. या स्क्रिप्टने मला भारावून सोडले आणि मी लगेच या रिमेकला होकार कळवला, असे शाहिदने सांगितले.
‘अर्जुन रेड्डी’साठी सध्या तयारी सुरू आहे. १ आॅक्टोबरपासून याचे शूटींग सुरू होईल, असेही त्याने सांगितले.
तेलगू भाषेतील ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. संदीप हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेक दिग्दर्शित करणार आहे. आता केवळ हा चित्रपट शाहिदच्या करिअरला कशी कलाटणी देतो, तेच बघायचे आहे.