लग्नापूर्वीच रोमॅन्टिक झाला नवरोबा! पाहा,अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा प्री-वेडिंग अल्बम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 16:35 IST2018-06-28T16:28:38+5:302018-06-28T16:35:32+5:30

‘मसान’ या चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी येत्या २९ जूनला लग्नबंधनात अडकते आहे. अ‍ॅक्टर आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत ती लग्नगाठ बांधतेय. 

shweta tripathi chaitanya sharmas pre wedding bash | लग्नापूर्वीच रोमॅन्टिक झाला नवरोबा! पाहा,अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा प्री-वेडिंग अल्बम!!

लग्नापूर्वीच रोमॅन्टिक झाला नवरोबा! पाहा,अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा प्री-वेडिंग अल्बम!!

ठळक मुद्दे मंगळवारी श्वेताच्या हातांवर मेहंदी सजली आणि काल बुधवारी प्री-वेडिंग पार्टी रंगली. या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

‘मसान’ या चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी येत्या २९ जूनला लग्नबंधनात अडकते आहे. अ‍ॅक्टर आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत ती लग्नगाठ बांधतेय. सोमवारी बॅचलर पार्टी झाली आणि मंगळवारपासून या लग्नाचे पारंपरिक विधी सुरू झालेत. मंगळवारी श्वेताच्या हातांवर मेहंदी सजली आणि काल बुधवारी प्री-वेडिंग पार्टी रंगली. या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात चैतन्य श्वेतासोबत बराच रोमॅन्टिक झालेला दिसला. या पार्टीत श्वेताने पिच कलरच्या लाचा आणि त्यावर लांब जॅकेट घातले होते तर चैतन्य ब्लॅक सूटमध्ये होता.

या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

काल श्वेताच्या मेहंदीचे फोटो दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. याचे कारण म्हणजे, मेहंदीच्या डिझाईनमध्ये श्वेताने आपली अख्खी प्रेमकथा चितारली होती. 

 

चैतन्य हा ‘स्लो चीता’ नावाने ओळखला जातो. श्वेतापेक्षा तो पाच वर्षांनी लहान आहे. मुंबईत अ‍ॅक्ंिटग वर्ल्डमध्ये श्वेता व चैतन्य पहिल्यांदा भेटले आणि पुढे भेटींचा हा ‘सिलसिला’ सुरू राहिला.

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण श्वेता ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पी. के. त्रिपाठी यांची मुलगी आहे. खरे तर तिला अभिनेत्री बनण्यात काहीही रस नव्हता. कारण तिला रंगमंच आवडायचा. पण नशिबाने तिला बॉलिवूड चित्रपटातही संधी दिली. ‘मसान’नंतर श्वेता अलीकडे ‘हरामखोर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर केली होती.

Web Title: shweta tripathi chaitanya sharmas pre wedding bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.