आदित्य पंचोली आणि कंगना राणौतच्या भांडणाला कंटाळून सूरज पंचोलीने ट्वीटर अकाऊंट केले डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 09:54 AM2017-09-12T09:54:44+5:302017-09-13T09:56:51+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड क्वीन कंगना राणौत चर्चाचा विषय बनली आहे. एक टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्युनंतर सगळ्यांच्या तोंडी कंगनाची ...
ग ल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड क्वीन कंगना राणौत चर्चाचा विषय बनली आहे. एक टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्युनंतर सगळ्यांच्या तोंडी कंगनाची चर्चा आहे. यात इंटरव्ह्यु दरम्यान कंगना आपल्या भूतकाळातल्या रिलेशनशिप्सबद्दल बिनधास्त बोलली होती. यात तिने आदित्य पंचोलीसोबत असलेल्या नात्याबाबत सुद्धा भाष्य केले.
कंगनाच्या या इंटरव्ह्युनतंर बॉलिवूडमध्ये भूंकपच यायचा बाकी होता. कंगनाच्या या इंटरव्ह्युचा परिणाम आदित्य पांचोलीच्या कुटुंबीयावरसुद्धा पडताना दिसतो आहे. नुकताच आदित्यचा मुलगा सूरज पंचोलीने हैराण होऊन आपले ट्वीटर अकाऊंटच डिलीट मारले आहे. सूरजने एकामागोमाग एक अनेक ट्वीट केले ज्यात या प्रकरणांशी आपला काहीच संबंध नसल्याचे नाही तरीही मला आणि माझ्या बहिणीला प्रत्येक गोष्टीत का टॅग करण्यात येते. सूरजने मीडियालाही आपल्याला टॅग करून या प्रकरणात अडकवू नये असे सांगितले होते.सूरजने ट्वीटर अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी शेवटेचे ट्वीट केले होते. ''माझी सगळ्या मीडिला ही विनंती आहे की कृपया मला आणि माझ्या बहिणीला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू नये.''
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांने लिहिले आहे, मी कोणाच्या विरोधात नाही आहे, पण मला या सगळ्या प्रकरणापासून लांब राहायचे आहे. मी खूप वर्षांपासून हे सगळे टाळण्याचा प्रयत्न करतो आहे.
तिसऱ्या ट्वीटमध्ये सूरज लिहितो, मला वाटते हे खूप चुकीचे आहे की प्रत्येक आर्टिकलमध्ये मला आणि माझ्या बहिणीला टॅग करण्यात येते.
आणि चौथ्या ट्वीटमध्ये त्यांने लिहिले आहे की, प्लीज एक मुलगा आणि मुलीच्या दृष्टीकोनातून आमचा विचार करा. तुम्हाला जे पाहिजे ते बोला मात्र आम्हाला यात सहभागी करु नका.
ALSO READ : आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच
या इंटरव्ह्यु दरम्यान क्वीनने आदित्य पंचोलीवर आपल्याला एका घरात अरेस्ट करुन फिजिकली अब्यूज करण्याचा आरोप लावला होता. तिने या प्रकरणानंतर आदित्य पंचोलीची पत्नी जरीनाकडे मदत मागितली होती मात्र तिने मदत करण्यास नकार दिल्याचे कंगनाने सांगितले होते. यानंतर तिने ह्रतिक रोशन आणि राकेश रोशन यांच्यावर सुद्धा आरोपांची तोफ डागली होती.