या क्रिकेटरला डेट करतेय शाहरुख खानची लेक सुहाना खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 11:47 IST2018-06-04T06:17:39+5:302018-06-04T11:47:39+5:30
शाहरुख खानला फॅमिली मॅन म्हटले जाते. आज शाहरुख बॉलिवूडचा बादशहा आहे. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी ...
.jpg)
या क्रिकेटरला डेट करतेय शाहरुख खानची लेक सुहाना खान
श हरुख खानला फॅमिली मॅन म्हटले जाते. आज शाहरुख बॉलिवूडचा बादशहा आहे. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो. शाहरुखला सुहाना, आर्यन आणि अब्राहम अशी तीन मुले आहेत. त्याची मुलगी सुहाना तर सध्या बॉलिवूडच्या अनेक पार्टींमध्ये, कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरदेखील ती खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री देखील करणार असल्याची चर्चा आहे. करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.
शाहरुखची मुलगी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सुहाना नुकतीच म्हणजेच २२ मे ला अठरा वर्षांची झाली. सुहानाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
आयपीएलमधील कोलकाता नाईट राईडर ही शाहरुख खानची टीम असून आयपीएलच्या सगळ्या मॅचेसना शाहरुख आवर्जून उपस्थित असतो. त्याची मुलगी सुहाना देखील यंदाच्या सगळ्या मॅचेसना उपस्थित होती. सुहाना या सिझनमधील सगळ्या मॅचेसना का उपस्थित होती, यामागे एक खास कारण आहे. केकेआरमधील एका खेळाडूसोबत सुहानाचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. शुभमन गिल असे या क्रिकेटरचे नाव असून या युवा क्रिकेटरसोबत अनेक वेळा सुहाना वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सुहाना आणि शुभनम यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे म्हटले जाते. शुभमन १९ वर्षांखालील भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील त्याच्या कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला. शुभनमने आजवर खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याची तुलना ही विराट कोहलीसोबत करण्यात येते.
शुभमन आणि सुहानाच्या मैत्रीविषयी मीडियात चर्चा होत असली तरी सुहाना आणि शाहरुख खानने यावर मौन पाळणेच पसंत केले आहे.
![shubhman gill]()
Also Read : बिग बीच्या नातवासोबत डिनर डेटला गेली शाहरूखची लाडकी सुहाना खान, फोटो होतोय व्हायरल!