'भारत'मध्ये सर्कस करताना दिसणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:35 AM2018-07-20T11:35:21+5:302018-07-20T11:46:59+5:30

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमात साठच्या दशकातील सर्कस सिक्वेन्स दाखवण्यात येणार आहे.

who will be seen in Circus in Bharat Movie | 'भारत'मध्ये सर्कस करताना दिसणार हा अभिनेता

'भारत'मध्ये सर्कस करताना दिसणार हा अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्दे'भारत' हा पीरिएड ड्रामावर आधारीत चित्रपट आहे'भारत'मध्ये पाहायला मिळणार इंडियन रशियन सर्कस सलमान खान करणार मोटरसायकलवर साहसी स्टंट

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत' हा पीरिएड ड्रामावर आधारीत आहे. सलमान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 22 जुलैपासून सुरूवात करणार असून हा सर्कसचा सिक्वेन्स असणार आहे. या चित्रपटात सलमानसह प्रियंका चोप्रा व दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सर्कसचा सेट गोरेगावमधील फिल्मीस्तान स्टुडिओत लागला असून ऑगस्टपर्यंत चित्रीकरण चालणार आहे. हे शूटिंग आटोपल्यानंतर माल्टा व अबूधाबीमध्ये चित्रीकरण पार पडणार आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमातील सर्कस सिक्वेन्स साठच्या दशकातील दाखवण्यात येणार आहे. याबाबत अली यांनी सांगितले की,' राज कपूर यांचा मेरा नाम जोकर या सिनेमाप्रमाणे इंडियन रशियन सर्कस पाहायला मिळणार आहे. यात सर्कसमधील सर्व स्टंट्स दाखवले जाणारेत. हा सलमान व दिशाचा इंट्रोडक्शन सीन असणार आहे. तसेच यात सलमान मोटरसायकलवर साहसी स्टंट करताना दिसेल तर दिशा ट्रॅपेजी अार्टिस्ट म्हणून दिसणार आहे.' 
मुंबईतील चित्रीकरणाच्या शेड्युलच्या अखेरीस होळीवरील गाण्याचे शूटिंग केले जाणार असून हे गाणे सलमान व प्रियंकावर चित्रीत केले जाणार असल्याचे जफर यांनी सांगितले व पुढे म्हणाले की, 'या चित्रपटात ते वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. कारण साठच्या दशकापासून आतापर्यंतचा कालावधी या सिनेमात दाखवला जाणार आहे. प्रियंकाच्या लूकवर काम केले जात आहे.'
'भारत' चित्रपटाची निर्मिती रील लाइफ प्रोडक्शन प्रा, लिमिटेड बॅनरखाली होत असून अतुल अग्निहोत्री निर्माते आहेत. हा सिनेमा 2019मध्ये ईदच्या वेळी प्रदर्शित होणार आहे. सलमानला सर्कसमध्ये स्टंट करताना पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: who will be seen in Circus in Bharat Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.