मोबाईल शॉपीतून २५ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Published: December 12, 2014 12:45 AM2014-12-12T00:45:27+5:302014-12-12T00:45:27+5:30
सिंदखेडराजा येथे चो-यांचे प्रमाण वाढले : नागरिकांमध्ये भीतीचे वा तावरण.
सिंदखेडराजा (बुलडाणा) : परिसरात चोर्यांच्या घटनेचे प्रमाण वाढले असून, नागरीकांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील एक मोबाईल शॉपीफोडून अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री तून घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, सदाशिव मारोती शेळके यांची ग्रामीण रुग्णालयासमोर मोबाईल शॉपी आहे. दरम्यान बुधवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सदर मोबाईल शॉपीचा टिनपत्रा काढुन दुकानात प्रवेश केला. आणि दुकानातील सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा एैवज लंपास केला. याप्रकरणी सदाशिव शेळके यांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याअगोदरही येथील एका मोबाईल शॉपीमधुन एक लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली होती. त्यातील चोरी गेलेला मोबाईल एका ग्राहकाने आज त्याच दुकानावर दुरूस्तीसाठी आनला असता, दुकान मालकाच्या सांगण्यावरून त्या ग्राहकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चोरीच्या घटनांचा पोलिसांकडून तपास लागत नसल्याने चोरट्यांना पोलिसांचेही अभय निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे नगरीकांमध्ये भि तीचे वातावरण निर्माण झाले आहे.