नळगंगा प्रकल्पात २0 टक्केच जलसाठा

By admin | Published: August 28, 2016 11:21 PM2016-08-28T23:21:10+5:302016-08-28T23:21:10+5:30

मोताळा येथे पावसाची हजेरी; प्रकल्पक्षेत्रात केवळ ४७0 मि.मी पाऊस.

About 20% water supply in Nalganga project | नळगंगा प्रकल्पात २0 टक्केच जलसाठा

नळगंगा प्रकल्पात २0 टक्केच जलसाठा

Next

मुरलीधर चव्हाण
मोताळा(जि. बुलडाणा),दि. २८: गत १८ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मोताळय़ासह परिसरातील काही गावांमध्ये पुन्हा हजेरी लावली. मात्र त्यानंतरही आतापर्यंंंत ४७0 मि.मी. पाऊस झाला असून, पावसाअभावी तालुक्याची दरोमदार असलेल्या नळगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने २0 ट क्य़ाची मजल गाठली. त्यामुळे पिकांना धोका कायम असून, मोठय़ा पावसाची गरज आहे.
तालुक्यात कुठे रिपरिप, कुठे हलका तर काही ठिकाणी दमदार पडलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तालुक्यात यावर्षी जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने कमी अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली. परंतु मागील १८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. बुधवारनंतर दोन दिवस मो ताळय़ासह कोथळी, तरोडा, शिरवा, खरबडी, आडविहिर, परडा, रिधोरा, रोहिणखेड, थड, काळेगाव त पोवन भागात चांगाल पाऊस झाला. तर डिडोळा, चिंचपूर, नळगंगापूर, भोरटेक, पिंपरीसह धामणगाव बढे परिसरात हलक्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलेच जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा तब्बल ८ हजार ९0८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, सोयाबीन पिकांचा खर्च कमी आणि बाजारभाव शाश्‍वत असल्याने शेतकर्‍यांनी यंदा सोयाबीनवर भर दिलेला आहे. जोरदार पावसाअभावी किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, ढगाळ वा तावरणामुळे पिके वेगवेगळया रोगराईस बळी पडत आहेत. विषारी औषधालाही कीड दाद देत नसल्याचे चित्र असून, शेतकरीवर्ग भविष्याबाबत धास्तावलेला आहे. तालुक्यातील १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ६८८.६ आहे. मागील अडीच महिन्यात ४७0 मि.मी. पाऊस झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक दिसत असला तरी आतापर्यंंंत झालेला पाऊस जोरदार नाही.
तुकड्या-तुकड्यात रिमझिम झालेल्या या पावसामुळे पलढग व नळगंगा प्रकल्पात पाणीसाठवण झालेली नाही. त्यामुळे मोठय़ा स्वरूपाच्या पावसाची नितांत गरज आहे.

Web Title: About 20% water supply in Nalganga project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.