रक्तदान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:10 PM2017-09-26T20:10:25+5:302017-09-26T20:11:01+5:30
बुलडाणा : स्धानीक जिजामाता महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने रक्तदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्धानीक जिजामाता महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने रक्तदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. वैशाली दिपके ह्यांनी आयोजनाचा हेतु रक्तदानाविषयी जनजागृतीचा असल्याचे सांगीतले. रक्तदानाचे महत्व व व्याप्ती ह्या प्रसंगी डॉ. विजयश्री हेमके ह्यांनी सांगीतले. आपल्या अध्यक्षीय भाषणातुन रक्त जीवनाकरिता अमृतासमान आहे व रक्तदान सर्व दानात श्रेष्ठ असल्यामुळे सुदृढ व्यक्तीनी रक्तदान करायला हवे असा संकल्प करण्याचे आवाहन डॉ. वंदना काकडे यांनी केले. संचालन साक्षी अंभोरे तर आभार प्रदर्शनाने किरण वाघ यांनी मानले.