बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:46 AM2017-11-10T00:46:09+5:302017-11-10T00:47:02+5:30
बुलडाणा: सर्व शेतकर्यांना त्यांच्या शेतीचा उतारा ऑनलाइन मिळावा असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश पूर्ण झाला असून, ऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण करून बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सर्व शेतकर्यांना त्यांच्या शेतीचा उतारा ऑनलाइन मिळावा असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश पूर्ण झाला असून, ऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण करून बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा तालुक्यात ऑनलाइन सातबाराचे काम २0 जुलै २0१५ रोजी सुरू करण्यात आले. यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मंडळ अधिकारी, ४0 तलाठी यांनी परिश्रम घेऊन ३0 सप्टेंबर २0१७ रोजी काम पूर्ण करण्यात आले. यावेळी सातबारा संगणकीरणाचे काम १00 टक्के पूर्ण करून बुलडाणा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
हस्तलिखित सात-बारा व संगणकीकृत सात-बारा तंतोतंत जुळविण्यासाठी जमावबंदी आयुक्तांकडून एडीट मोड्युल उपलब्ध करून दिले होते. या मोड्युलद्वारे शेतकर्यांना डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा ऑनलाइन पद्धतीने मिळू लागले आहेत. तसेच नागरिकांना सुलभ रीतीने संगणकीकृत सत्यप्रती व इतर सेवा प्राप्त करून घेता याव्यात, यासाठी तालुका व मंडल मुख्यालयात की ऑस्क मशीन बसविण्यात आले आहे. पूर्वी शेतकर्यांना सात-बारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत होते; परंतु सात बारा ऑनलाइन मिळविता यावा यासाठी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे डिजिटल सही असलेला सात-बारा उतारा दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे शेतकर्यांना तलाठी कार्यालयात जाण्याचा त्रास कमी झाला असून, दिलासा मिळाला आहे.