कृषी महोत्सवानिमित्त शुक्रवारी खामगावात बैलगाडी दिंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:16 AM2018-02-14T01:16:12+5:302018-02-14T01:16:19+5:30

खामगाव : खामगाव शहरात होऊ घातलेल्या कृषी महोत्सवानिमित्त शहरातून भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Bungalow Dindi in Khamaghat on Friday for the festival of agriculture! | कृषी महोत्सवानिमित्त शुक्रवारी खामगावात बैलगाडी दिंडी!

कृषी महोत्सवानिमित्त शुक्रवारी खामगावात बैलगाडी दिंडी!

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने  सहभागी व्हावे - आमदार अँड. आकाश फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव शहरात होऊ घातलेल्या कृषी महोत्सवानिमित्त शहरातून भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११ वाजता शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथून कृषी महोत्सव जनजागृती दिंडी निघेल. यामध्ये खामगाव मतदार संघातील शेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने  सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
पश्‍चिम विदर्भातील सर्वात मोठा  व भव्यदिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे.  १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेजच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रारंभदिनी प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडी निघत आहे. याबाबत १२ फेब्रुवारी २0१८ रोजी भाजपा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व सरपंचांची बैठक पार पडली. 
बैठकीला अँड. आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख ता.अध्यक्ष शरदचंद्र गायकी, सरचिटणीस डॉ. एकनाथ पाटील, सुरेश गव्हाळ, शेगाव कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, कृउबास संचालक दिलीप पाटील, जि.प.सदस्य पुंडलिक बोंबटकार, पं.स.सदस्य विलास काळे, युवराज मोरे, तुषार गावंडे, राजेश तेलंग, ज्ञानदेवराव मानकर, ज्ञानदेव चिमणकार, लाला महाले, सावरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 प्रथमच खामगावात अतिभव्य असा कृषी महोत्सव होत आहे.  शेतक-यांसाठी हा महोत्सव नवसंजीवनी ठरणारा आहे. राज्यात भाजपा सरकार आल्यापासून शेतकर्‍यांचे  उत्पन्न दुप्पट करण्याचे  व त्याचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  त्यासाठीच संपूर्ण राज्यात कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात नवीन कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, वनौषध वनस्पती, नवनवीन जातीचे बी-बियाणे, कृषी क्षेत्रातील यांत्रीकीकरण, कृषी संलग्न पुरक व्यवसाय, पशुपालन, फलोत्पादन आधारीत काढणी पश्‍चात तंत्रज्ञान,  सांस्कृतिक कार्यक्रम असे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणार्‍या कृषी महोत्सवातून कृषी विकास करण्याची चांगली संधी या माध्यमातून आली आहे. कृषी विभागामार्फत ज्या शेतकर्‍यांना ट्रॅक्टर देण्यात आले आहे, असे लाभार्थी शेतकरी सहभागी होणार आहेत.  तसेच मतदार संघातील शेतकर्‍यांनी आपले बैल व बैलगाडी सजवून सहभागी व्हावे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  सुरुवात होईल. ही कृषी रॅली प्रमुख मार्गाने जावून दिंडीचा समारोप कृषी महोत्सव स्थळी, पॉलीटेक्नीक ग्राऊंड जलंब रोड येथे होईल. या कृषी दिंडीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

Web Title: Bungalow Dindi in Khamaghat on Friday for the festival of agriculture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.