खामगाव येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकाचा मृत्यू; उपचारास विलंब झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:17 PM2018-03-08T17:17:03+5:302018-03-08T17:17:03+5:30
खामगाव : येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली.
खामगाव : येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. उपचारास विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
खामगाव येथील जुना फैल भागातील मिर्झा तन्वीर बेग नामक १ वर्षीय बालकास सकाळी उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उपचारास विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. गेल्या आठवड्यात सुद्धा खामगाव येथील जिल्हा समानच रुग्णालयात अशाचप्रकारे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड सुद्धा केली होती. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस सामान्य रूग्णालयात दाखल झाले आहेत.