पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:29 AM2017-08-07T03:29:57+5:302017-08-07T03:30:06+5:30

crop loan queque farmers hands fractures | पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती 
शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळपासून उपाशी रांगेत उभे असलेले शेतकरी प्रकाश अवसरमोल यांना दुपारी २ वाजेच्या 
दरम्यान धक्का लागला आणि अंगात त्राण न राहिल्याने ते कोसळले यात त्यांना दोन हात गमवावे लागले आहे.
वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल (वय ६० वर्ष) हे ५ आॅगस्ट रोजी पहाटे ७ वाजेपासून लोणार शहरात दाखल झाले. पीक विमा भरण्याची शेवटची तारीख
असल्याने पीक विमा भरणा केंद्रावर रांगेत उभे होते. पीक विमा भरण्यासाठी रात्रीपासूनच तेथे अनेक शेतकरी बसले होते. भरपूर गर्दी असल्याने प्रकाश अवसरमोल सकाळी ८
वाजल्यापासून रांगेत उभे होते. पीक विमा भरणा केंद्र्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यात दुपारी २ वाजता प्रकाश अवसरमोल यास रांगेतच घाम आला. त्यात धक्का लागल्याने ते
पायरीवर कोसळले. काही लोकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी मेहकर येथे जाण्याचा सल्ला दिला. मेहकर येथील
रुग्णालयात आणले असता अवसरमोल यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला आहे.












 

Web Title: crop loan queque farmers hands fractures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.