डेंग्यु सदृष्य तापाचे रुग्ण आढळले
By admin | Published: November 14, 2014 11:19 PM2014-11-14T23:19:02+5:302014-11-14T23:19:02+5:30
लोणार तालुक्यातील मातमळ येथे डेंग्यू सदृश्य तापेचे दोन रुग्ण,परिसरात भितीचे वातावरण.
कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील मातमळ येथे डेंग्यू सदृश्य तापेचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. लोणार तालुक्यात सुरु असलेल्या डेंग्यू सदृश्य तापेचे रुग्ण हिरडव आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या मातमळ येथे आढळून आले आहेत. मातमळ येथे अक्षरा राजेश मापारी (११) व ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे (१0) या दोन चिमुकल्यांना डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे आढळून आले आहे. त्यातील अक्षरा मापारी हिचेवर औरंगाबाद येथे तर ज्ञानेश्वर शिंदे याचेवर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच गावात मलेरिया, डायरिया व अज्ञात तापेचे रुग्ण दिसून येत आहेत. थंडी वाजणे, पांढर्या पेशी कमी होणे, यासह विविध साथीच्या आजाराने परिसरात थैमान घातले आहे. अशातच येथील विद्युत रोहित्र जळाल्याने गावात २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे.