प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रीघ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:04 AM2018-02-08T00:04:02+5:302018-02-08T00:04:08+5:30
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत पोहोचली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत पोहोचली होती.
श्री संस्थानच्यावतीने वन-वे एकेरी मार्ग करण्यात आला होता. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी महाप्रसाद श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली होती. यात श्रींच्या भक्तांनी शिस् तीत दर्शनाचा लाभ घेतला. यासाठी श्री सेवक आपली भक्तिभावाने अर्पण करीत होते. श्रींच्या प्रकटस्थळी भव्य रांगोळी काढण्याची चंद्रकात बिगोणे दसरा नगर येथे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, तर मंदिरापासून पालखी मार्गात अमिताभ गणेश नंदागवळी भुसावळ, राजू राजपूत, रवींद्र कैकाडी यांनी रांगोळी काढून आपली भक्ती अर्पण केली.
दोन लाखांचे उत्पन्न!
संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवातील अतिरिक्त बसमुळे शेगाव बस आगाराला दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रकट दिनानिमित्त एसटीने सर्वच आगारातून अतिरिक्त गाड्या सुरू केल्या होत्या.
१३१८ दिंडी सहभागी
प्रकट दिन महोत्सवात १३१८ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ५0 हजार ८४ वारकर्यांचा सहभाग होता. यावेळी १२९ दिंड्यांना साहित्याचे वि तरण करण्यात आले.