कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका - रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:48 AM2017-11-11T00:48:54+5:302017-11-11T00:50:06+5:30
तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शिवसेनेच्यावतीने १0 नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनी संदर्भा त आयोजित जनता दरबारात जनतेने वीज कंपनी विरोधात आपला रोष व्यक्त केला. तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले.
स्थानिक वीज वितरण कार्यालयात १0 नोव्हेंबर रोजी ग्राहकांसाठी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी आ. रायमुलकर बोलत होते. या जनता दरबाराला खा. प्रतापराव जाधव, कार्यकारी अभियंता पी. यु. जायभाये, सभापती माधवराव जाधव, सभापती जया कैलास खंडारे, उ प-सभापती बबनराव तुपे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, उप- सभापती राजू घनवट, उप-तालुकाप्रमुख समाधान साबळे, रामेश्वर बोरे, केशवराव खुरद, संजय धांडे, सुरेश काळे, मदन चनखोरे, मोतीचंद राठोड, भुजंग म्हस्के, रमेश देशमुख आदी हजर होते.
जनता दरबारात सर्वप्रथम दृगबोरी येथील यशवंता डाखोरे व ८ शे तकर्यांनी तक्रारी केल्या. यामध्ये विद्युत कनेक्शनसाठी ३0 मे २0१४ ला कंपनीकडे पैसे भरले आहेत; परंतु अद्यापही वीज कनेक्शन मिळाले नाही.
आरेगाव येथील गावकरी विद्युत रोहित्राची मागणी करून थकले असून, गावकर्यांनी आतापर्यंत १२ हजार रुपये खर्च केले; मात्र रोहित्र मिळाले नाही, अशी तक्रार सरपंच संजय धांडे व गावकर्यांनी मांडली. कृ.उ.बा. समिती संचालक केशवराव खुरद म्हणाले की, भोसा येथील विद्युत जनित्र फेल झाल्यानंतर नवीन अद्याप जोडले नाही. या बाबतीत कंत्राटदार नंदन देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पारखेड ये थील सरपंच मोतीचंद राठोड यांनी आपली तक्रार मांडताना पाच वर्षां पासून सिंगल फेजसाठी प्रयत्न करीत आहे.
मात्र काम होत नाही, यावर खा. प्रतापराव जाधव यांनी अभियंत्यांना धारेवर धरुन मेंटनंस एजन्सीबाबत उद्या ऑर्डर काढा, असे कार्यकारी अभियंता पी.यू. जायभाये यांना निर्देश दिले, तर कंत्राटदार पैसे मागतात, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. या दरबारात मोळा, माळीपेठ, उसरण, कोयाळी सास्ते, रायपूर, साब्रा, ब्रम्हपुरी, शहा पूर, देउळगावमाळी गावचे विविध प्रश्नही सोडविण्यात आले. उप- कार्यकारी अभियंता प्रशांत कलोरे यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. संचालन अभियंता मधुकर बुगदाणे तर आभार सं तोष डोमळे यांनी मानले.